• Sat. Sep 21st, 2024
पुतण्याने काकांच्या ४० वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला; बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांना धोबीपछाड

बीड: बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागरांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावलाय. आमदार संदीप क्षीरसागर यांनी ५ पक्षांची मोट बांधून काका विरोधात दंड थोपटले होते. आज कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हाती आला. यामध्ये संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागरांना धोबीपछाड केले. या विजयानंतर संदीप यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केलाय.मागील ४० वर्षांपासून बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची एक हाती सत्ता होती. ही निवडणुक मात्र प्रतिष्ठेची बनवून आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिंदे गट, ठाकरे गट, भाजपा, शिवसंग्राम आणि राष्ट्रवादी पक्षाची मोट बांधून निवडणुकीला सामोरे गेले होते. आता यावरूनच संदीप क्षीरसागर यांनी काकांना निवडणुकीमध्ये धोबीपछाड केले आहे. त्यामुळे क्षीरसागर यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे.

सांगली बाजार समितीत मविआचा झेंडा; इस्लामपुरात जयंत पाटलांचा करिष्मा, पण विट्यात मोठा धक्का!
बीड जिल्ह्याचा बाजार समिती निकाल जाहीर..

> जिल्ह्यात एकूण दहा कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत. त्यातील धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल दोन महिन्यांपूर्वी हाती आला. यामध्ये भाजपने वर्चस्व निर्माण केले. तर आष्टी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचे नेते सुरेश धस यांनी बाजार समिती बिनविरोध निवडून आणली. त्यामुळे या ठिकाणी भाजपने एकहाती वर्चस्व निर्माण केले.

> शुक्रवारी जिल्ह्यातील सहा बाजार समितीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यात वडवनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ मुंडे यांना पराभव स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी वर्चस्व निर्माण केले.

भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीने मैदान मारलं, अकोला बाजार समितीत NCPचा सभापती बसणार
> आज पाच बाजार समितीचा निकाल लागला. यामध्ये बीड बाजार समितीवर ४० वर्षांपासूनच्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या सत्तेला पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी सुरुंग लावला.

> परळी बाजार समितीवर पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी आपल वर्चस्व कायम राखलं. यामध्ये पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारा लागला. धनंजय मुंडे यांचा इथे विजय झाला आहे.

> अंबाजोगाई बाजार समिती १५ जागेवर धनंजय मुंडे यांच्या उमेदवारांनी विजय मिळवला पंकजा मुंडे यांच्या उमेदवारांना तीन जागेवर समाधान मानावे लागले.

> केज कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपने वर्चस्व राखले आहे.

> गेवराई बाजार समितीमध्ये माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांना मात देत आपलं वर्चस्व येथे कायम ठेवले आहे.

स्वप्न होतं गायक होण्याचं पण परिस्थितीमुळे बनला गोळेवाला; तरुणानं हार मानली नाही, महिन्याला भरघोस कमाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed