• Sun. Sep 22nd, 2024
भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीने मैदान मारलं, अकोला बाजार समितीत NCPचा सभापती बसणार

अकोला : अकोला बाजार समितीवर राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपप्रणीत सहकार आघाडीची सत्ता आली आहे. या बाजार समितीतील सर्व १८ जागांवर एकतर्फी विजय झाला आहे. या निवडणुकीत वंचित समर्थित पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे. अकोला बाजार समितीत सहकार आघाडीत राष्ट्रवादीला सर्वाधिक ११ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे सभापती राष्ट्रवादीचा होणार याचा मार्गही सुकर झाला आहे. दरम्यान, इथे भाजप ५, उद्धव ठाकरे गट २ जागांवर निवडून आले आहेत. अकोला बाजार समितीत ‘सहकार पॅनल’ची तब्बल गेल्या ४० वर्षापासून सत्ता असून यंदाही ती सत्ता कायम राहिली आहे.दरम्यान, या बाजार समितीत निवडणुकीत राष्ट्रवादीचे शिरीष धोत्रे, भाजप आमदार रणधीर सावरकर तसेच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांनी एकत्रित येत वंचितचा पराभव केला. दरम्यान, सहकार पॅनलकडून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी उभे होते. तर ठाकरेंच्या शिवसेनेतील एकाने बंडखोरी केल्याने विरुद्ध पॅनलमध्येही शिवसेनेचा एक पदाधिकारी सहभागी झाला होता.

ऐतिहासिक विजय; औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 16 जागांवर भाजप

अकोला बाजार समितीतील पक्षीय बलाबल –

एकूण जागा : १८

भाजप : ०५
राष्ट्रवादी : ११
ठाकरे गट : ०२
वंचित : ००

असे आहेत विजयी उमेदवार-

विजयी उमेदवार – पक्ष/आघाडी
विकास पागृत – ठाकरे गट
दिनकर वाघ – राष्ट्रवादी
वैभव माहोरे – भाजप
संजय गावंडे – भाजप
चंद्रशेखर खेडकर – राष्ट्रवादी
राजीव शर्मा – भाजप
शिरीष धोत्रे – राष्ट्रवादी
दिनकर नागे – राष्ट्रवादी
राजेश बेले – भाजप
भरत काळमेघ – भाजप
ज्ञानेश्वर महल्ले – राष्ट्रवादी
अभिमन्यू वक्टे – राष्ट्रवादी
सचिन वाकोडे – राष्ट्रवादी
रामेश्वर वाघमारे – राष्ट्रवादी
शालिनी चतरकर – राष्ट्रवादी
माधुरी परनाटे – राष्ट्रवादी
मुकेश मुरूमकार – ठाकरे गट
हसन चौधरी – राष्ट्रवादी

सहकार क्षेत्रासह अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या अकोला जिल्ह्यातील तीन कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी काल शुक्रवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली होती. ज्यामध्ये अकोट, अकोला, बार्शीटाकळी बाजार समितीचा समावेश आहे. या तीनही बाजार समितींमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान करण्यात आले होते. १३७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. आता या तीनही बाजार समितींची मतमोजणी करून निकाल घोषीत करण्यात येत आहे. ज्यामध्ये आतापर्यंत अकोला बाजार समितीचा निवडणूक निकाल लागलाय.

अकोला, अकोट व बार्शीटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात शुक्रवारी मतदान झाले. त्यामुळे सहकार क्षेत्रातील वातावरण तापले होते. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना सोबत लढले. राज्यस्तरावर या पक्षामध्ये मतभेद असले तरी सहकाराच्या निवडणुकीत मतभेद मात्र दिसून आले नाही. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी देखील निवडणुकीत होती. मात्र, असे असले तरी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आपापल्या पक्षाचे बळ वाढवताना दिसून आले. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रामुख्याने सहकार पॅनलविरुद्ध वंचित बहुजन आघाडी-सरपंच संघटना, शिव शेतकरी पॅनलमध्ये लढत झाली.

एकनाथ खडसेंना मोठा धक्का; भुसावळ बाजार समिती निवडणुकीत भाजप-शिंदे गटाचं एकहाती वर्चस्व

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed