• Mon. Nov 25th, 2024

    जयश्री फंडने पटकावली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा, मात्र स्पर्धेचा शेवट झाला वादाने

    जयश्री फंडने पटकावली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा, मात्र स्पर्धेचा शेवट झाला वादाने

    कोल्हापूर:वादापासून सुरुवात झालेली कोल्हापुरातील महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा शेवट सुद्धा वादानेच झाला. अनधिकृत आणि अधिकृत या वादापासून सुरुवात झालेली दीपाली सय्यद यांच्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आजच्या अंतिम सामन्यावेळी प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा अहमदनगरच्या भाग्यश्री फंड हिने पटकावली तर कोल्हापूरच्या अमृता पुजारी या महिला मल्लाचा भाग्यश्रीने २-२ ने पराभव करत महिला महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं. मात्र स्पर्धेनंतर अमृता पुजारीचे प्रशिक्षक तसेच त्यांच्या पालकांनी या स्पर्धेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करत ही स्पर्धा पूर्णपणे मॅनेज झालेली स्पर्धा होती असा आक्षेप घेत स्पर्धेवर आणि आयोजकांवर टीका केली. तसेच आपल्यावर अन्याय झाला असेही ते म्हणाले.राज्यभरातील २०० स्पर्धकांचा सहभाग

    कोल्हापुरातील खासबाग मैदानात भारतीय कुस्ती महासंघाने राज्य कुस्तीगीर परिषदेवर नेमलेल्या अस्थायी समितीच्या परवानगीने व दीपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पहिली महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी संपूर्ण राज्यातून सफल २०० स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या त्या स्पर्धेचा आज अंतिम सामना झाला.

    एसटी बस चालकाचा ताबा सुटला, बस नाल्यात उलटली, ५ प्रवासी गंभीर, ४ वर्षीय बालकासह १५ जखमी
    अहमदनगरची भाग्यश्री फंड आणि कोल्हापूरची अमृता पुजारी यांच्यात अंतिम लढत झाली. यामध्ये भाग्यश्रीने अमृतावर विजय मिळवत चांदीच्या गदेवर आपलं नाव कोरलं. मात्र यानंतर ही संपूर्ण स्पर्धा मॅनेज असल्याचा आरोप अमृता पुजारी यांचे प्रशिक्षक आणि त्यांच्या पालकांनी केली. सुरुवातीला वजनी गटातून देखील भाग्यश्रीकडून नियमानुसार एकच कपडा घालून वजन करणे अपेक्षित असताना भाग्यश्रीने अंगावर चार जोड कपडे घातले होते. तसेच ६४ किलो वजन असताना या कपड्यांमुळे तिचे ६८ किलो वजन झाले. तरीही आयोजकांकडून आम्ही वजन असंच करतो असे सांगितल गेलं आणि महिला पंचाची मागणी केलेली असताना सुद्धा आयोजकांकडून मॅनेज झालेले कोच ठेवण्यात आले असा आरोप अमृताच्या वडिलांनी केला आहे. तसेच आमच्या मुलींवर अन्याय झाल असल्याच देखील त्यांनी म्हटल आहे.

    कल्याण हादरले; अल्पवयीन मुलीवर चौघांचा सामूहिक अत्याचार, इन्स्टाग्रामवर झाली होती मैत्री
    काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची सांगलीत पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. याच वेळी भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीमार्फत कोल्हापुरातही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या मुळे कोणाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा अधिकृत याचा वाद विवाद सुरू झाला. हा वाद सुरू असतानाच सांगलीतील स्पर्धा अधिकृत म्हणून जाहीर होऊन ही पार ही पडली, तर कोल्हापुरातील ही होत असलेली ही महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अनधिकृत असल्याचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पत्रक प्रसिद्ध करून सांगितले.

    इतकेच नाही तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघावर तसेच पंचांवर शिस्तभंगाची कारवाही करण्यात येईल असा थेट इशाराच दिला होता. तर काल खासदार ब्रजभूषण सिंह हे अंतिम सामन्यासाठी प्रमुख पाहुणे येत असल्याचे समजतात कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्त्या आणि जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी त्यांना जोरदार विरोध केला. ज्या ब्रजभूषणवर महिलांवर लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहे अशा व्यक्तीला का महिला महाराष्ट्र कुस्तीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून का बोलवला याचा जाब विचारण्यासाठी महिलांनी एन स्पर्धेत गोंधळ घातला.

    क्रूरतेचा कळस; तरुणाने लग्नाचे आमिष दाखवले, नंतर संबंध ठेवले; बेल्टने मारहाण करून सिगारेटचे चटके दिले
    दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये हा अंतिम सामना रंगला. यामध्ये अहमदनगरची भाग्यश्री फंड हिने महिला महाराष्ट्र केसरीचे गदा पटकावली. तसेच बक्षीस म्हणून तिला चार चाकी देखील देण्यात आली. तर प्रत्येक वजनी गटामध्ये पहिला क्रमांक आलेल्या महिला कुस्तीगिरांना दुचाकी बक्षीस देण्यात आली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *