मुंबई :मुंबईतील नेहरु नगर भागात महिला सब इन्स्पेक्टर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ३० वर्षीय शीतल येडके यांचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला. येडके यांच्यावर दीर्घ काळ कामावर गैरहजर राहिल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शेजाऱ्यांनी दुर्गंधीविषयी पोलिसांना फोन करुन सांगितलं आणि हा प्रकार उघडकीस आला.३० वर्षीय महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल येडके राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या घरात कुठलीही संशयास्पद गोष्ट आढळलेली नाही. झोन सहाचे डीसीपी हेमराज राजपूत यांनी येडके यांच्या घराची तपासणी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
मुंबईतील कुर्ला परिसरात असलेल्या नेहरु नगर भागात शीतल येडके भाड्यावर घर घेऊन राहत होत्या. येडकेंच्या मृतदेहाचा उग्र वास पसरु लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडला. यावेळी शीतल येडके यांचा मृतदेह घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात शीतल येडके यांनी आत्महत्या केल्याचा कयास पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करुन अधिक तपास सुरु केला आहे.
मित्र-मैत्रिण फिरण्यासाठी गेले, रस्त्यातच नराधमांनी अडवलं, एकाने छेड काढली, दुसऱ्याने गोळी घातली
आम्हाला एका महिला पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह नेहरु नगर येथील तिच्या निवासस्थानी सापडला. अपघाती मृत्यू म्हणून आम्ही गुन्हा दाखल केला आहे. आम्हाला आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे, अशी माहिती झोन सहाचे डीसीपी हेमराज राजपूत यांनी दिली.