• Sat. Sep 21st, 2024
संतापजनक! नवऱ्याचं निधन; तेराव्याच्या दिवशीच बायकोवर अतिप्रसंग; दीराचं धक्कादायक कृत्य

छत्रपती संभाजीनगर: पतीच्या निधनानंतर अवघ्या तेराव्याच दिवशी पत्नीच्या वाट्याला छळ आल्याची संतापजनक घटना पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे घडली आहे. तेराव्याचा विधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दावरवाडी येथील एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर त्याच्या तेराव्याचा कार्यक्रम आवरला होता. त्यानंतर आरामासाठी मृत व्यक्तीची पत्नी आपल्या चुलत सासूच्या घरी आरामासाठी थांबली होती. त्यावेळी महिलेच्या चुलत दीराने घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला असल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

Rajaram Sakhar Karkhana Result LIVE : छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीची मतमोजणी, वाचा LIVE अपडेट्स…
दरम्यान, महिलेनं नकार देऊनही बळजबरीने चुलत दीराने बलात्कार केल्याने सदर महिलेनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरु असल्याचं सांगितलं आहे. पण, पतीच्या निधनानंतर अवघ्या तेराव्याच्या दिवशीच पत्नीवर हा प्रसंग ओढावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुलीच्या मृतदेहासोबत ४ दिवस राहत होती ६८ वर्षीय आई, डिलीव्हरी बॉयमुळे भयंकर दृष्य समोर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed