• Sat. Sep 21st, 2024

विश्वासू ड्राव्हरच निघाला मास्टर माईंड, चायनीजच्या गाडीवर कट अन् मालकाला भर रस्त्यात लुटलं…

विश्वासू ड्राव्हरच निघाला मास्टर माईंड, चायनीजच्या गाडीवर कट अन् मालकाला भर रस्त्यात लुटलं…

नागपूर:शहरातील सिव्हिल लाइन्स आवारात पिस्तुलच्या धाकावर दिवसाढवळ्या लुटमारी करण्यात आली होती. या गुन्ह्याचा पर्दाफाश करताना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची सुमारे साडेपाच लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. व्यावसायिकासोबत काम करणाऱ्या चालकाने आपल्या सहकाऱ्यांना टिप देऊन हा संपूर्ण प्रकार घडवून आणल्याचं तपासात समोर आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली असली तरी या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. अमित नागोसे, अमित खांडेकर, अभिषेक बनसोड आणि ललित पडोती अशी आरोपींची नावे आहेत.अंबाझरी पोलिस ठाण्याचा सुरक्षित परिसर समजल्या जाणाऱ्या लेडीज क्लब चौकाजवळ शनिवारी सायंकाळी तीन आरोपींनी सुमारे ८ लाख रुपयांची रोकड लुटली. योगेशने हे पैसे इतवारीतील एका व्यावसायिकाकडून घेतले होते आणि ते ड्रायव्हर अमित नागोसे याच्यासोबत कारमधून कार्यालयात आणत होते. आरोपींचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्यात तीन आरोपी दुचाकीवर बसलेले दिसत आहेत.

२००० वर्ष जुना खजिना सापडला, जमिनीत पुरलेला होता, पाहून पुरातत्त्वशास्त्रज्ञ भलतेच खूश
चालक हा मुख्य आरोपी निघाला

वास्तविक, आरोपी अमित नागोसे हा व्यावसायिकाकडे ६ महिन्यांपासून ड्रायव्हर म्हणून काम करत होता, त्याने त्याचे तीन साथीदार अमित खांडेकर, अभिषेक बनसोड आणि ललित पडोती यांना सोबत घेऊन संपूर्ण घटनेची माहिती त्यांना दिली होती. आरोपी अमित खांडेकर याने आयटी पार्कमध्ये चायनीजची गाडी लावली आणि त्याच गाडीवर बसून आरोपीने संपूर्ण घटनेची कथा लिहिली.

नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला

कॉल रेकॉर्डवरून सत्य समोर आले

घटनेच्या वेळी फिर्यादी योगेश चौधरी यांच्यासह चालक अमित नागोसे कारमध्ये उपस्थित होते. पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी ललित पडोती हा अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही दुचाकींसह सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अडखळत चालत होता, तरीही पोलिसांना संशय, प्लास्टर कापून पाहिलं तर कोट्यवधींचं घबाड सापडलं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed