• Mon. Nov 25th, 2024

    घाटकोपरमधील दोन चिमुकले देवीच्या उत्सवासाठी रायगडला आले अन् तलावात बुडाले, अख्खं गाव सुन्न

    घाटकोपरमधील दोन चिमुकले देवीच्या उत्सवासाठी रायगडला आले अन् तलावात बुडाले, अख्खं गाव सुन्न

    रायगड:मुंबई घाटकोपर येथून कोकणात रायगड जिल्ह्यात रोहा येथे देवीच्या उत्सवासाठी गावी आलेल्या दोन सहा वर्षीय चिमुकल्यांचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. आरूष हितेश भोय (वय वर्ष ६ राहणार झोतिरपाडा – पेण), तर निरव रोहन वाघमारे (वय वर्ष ६ राहणार निडी – रोहा, सध्या राहणार पतंगनगर घाटकोपर) अशी मृत्यू पावलेल्या निष्पाप चिमुकल्यांची नावे आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.सहा वर्षाच्या दोन बालकांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २३ एप्रिल रोजी रोहा तालुक्यातील निडी गावी घडली आहे. निडी गावातील नवनाथ वाघमारे यांच्या घरासमोरील तलावात ही मुले पोहण्यासाठी गेली होती. त्यांना तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला आहे.
    पुण्याला जाताना गाडी दुभाजकाला धडकून तीनदा पलटी, आई वडिलांसमोरच ३ वर्षीय श्रीयांशने जीव सोडला
    ही दोन्ही बालकं आपल्या रोहा तालुक्यातील नीडी गावातील देवीच्या उत्सवासाठी आले होते. गावासह घरातील सर्व देवीच्या उत्सवात मग्न असताना हे दोघे
    तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहता-पोहता पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी ग्रामस्थ तळ्याकाठी गेले असता तलावाच्या बाहेर कातळावर एका बालकाची चप्पल सापडली. तर एका बालकाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्याला बाहेर काढत असतानाच दुसऱ्या बालकाचाही मृतदेह सापडला.

    रायगडच्या माणगावमध्ये भीषण अपघात, कार आणि ट्रकच्या धडकेत नऊ जणांचा मृत्यू

    ऐन देवीच्या उत्सवात हृदय हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना घडल्याने निडी गावावर शोककळा पसरली आहे. अवघ्या ६ वर्षीय बालकांच्या मृत्यूमुळे भोय आणि वाघमारे कुटुंबीयाला मोठा धक्का बसला आहे. या दुर्घटनेबाबत रोहा पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली आशुतोष म्हात्रे पुढील तपास करत आहेत.

    २००० वर्ष जुना खजिना सापडला, जमिनीत पुरलेला होता, पाहून पुरातत्त्वशास्त्रज्ञ भलतेच खूश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *