• Sat. Sep 21st, 2024

माणुसकीला काळिमा, भीक मागणाऱ्या मुलीला घरी आणले, काम दिले, लग्नही लावले, पण तिने केले…

माणुसकीला काळिमा, भीक मागणाऱ्या मुलीला घरी आणले, काम दिले, लग्नही लावले, पण तिने केले…

मुंबई : मुंबई उपनगरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. घरात गेल्या २५ वर्षांपासून काम करणाऱ्या मोलकरणीने सोन्याची चेन आणि मोबाइल फोनसाठी मालकिणीचा खून केला. ही धक्कादायक घटना मालाड येथे घडली आहे. विशेष म्हणजे ही मोलकरीण अपंग असून २० वर्षांपूर्वी ती रेल्वे स्थानकावर भीक मागत फिरत असायची. या मालकिणीने दया दाखवत तिला आपल्या घरी आणले, काम दिले. नंतर तिचे लग्नही लावून दिले. मात्र, या मोलकरणीने माणुसकीला काळिमा फासत अशा मालकिणीचा सोन्याची चेन आणि मोबाइलसाठी खून केला.या प्रकरणी पोलिसांनी या मोलकरणीसह तिचा पती आणि मुलाला अटक केली आहे. मोहम्मद उमेर इब्राहिम शेख, शबनम प्रवीण उर्फ मोहम्मद उमेर शेख, मोहम्मद शहजाद उमेर शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मोलकरीण असलेल्या आरोपीचे नाव शबनम असे आहे. शबनम ही अनाथ आहे. ती २५ वर्षांपूर्वी रेल्वेस्थानकावर भीक मागत असे. डिकोस्टा यांनी एकदा शबनमला रेल्वेस्थानकावर भीक मागताना पाहिले. अपंग शबनमला पाहून त्यांना तिची दया आली. त्यांनी तिला घरी आणले. घरी काम दिले आणि पालनपोषण केले. पुढे डिकोस्टा यांनी तिचे लग्नही लावून दिले.

के चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष राज्यात मुसंडी मारण्याच्या तयारीत, भाजप-सेना आमदार संपर्कात असल्याचा दावा
शबनम ही डिकोस्टा यांच्या घरी गेल्या २५ वर्षांपासून काम करत आहे. आपल्या मालकिणीकडे खूप पैसा आहे असे शबनमला नेहमीच वाटायचे. असा विचार करत करत ती मालकिणीचे उपकार विसरून गेली. मालकिणीच्या घरात लूट करण्याचा विचार तिने केला. त्यानंतर तिने पती आणि मुलाच्या मदतीने चोरीचा कट रचला.

एकदा डिकोस्टा यांचा नातू गुरुवारी दुपारी कामानिमित्त बाहेर गेला. हीच संधी साधून शबनमने पती आणि मुलाच्या मदतीने मालकिणीला बाथरुमधील पाण्याच्या बादलीत बुडवून मारून टाकले. त्यानंतर तिने मालकिणीची सोन्याची चेन, मोबाइल फोन आणि स्मार्ट वॉच घेऊन पळून गेली.

नागपूरमध्ये थरार; डीजे वाजवण्यावरून होता जुना वाद, तीन तरुणांनी केला हल्ला, तरुण गंभीर जखमी
दृश्य पाहून शेजारी महिलेला बसला धक्का

कामानिमित्त घराबाहेर गेलेला डिकोस्टा यांचा नातू सतत त्यांना फोन करत होता. मात्र त्या उत्तर देत नव्हत्या. मग त्याने शेजारी फोन करून पाहायला सांगितले. त्यानंतर शेजारी महिला डिकोस्टा यांच्या घरी गेली. मात्र घरातील दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. घाबरलेल्या शेजारी महिलेने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डिकोस्टा यांचा मृतदेह ताब्यात घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला.

आरोग्यमंत्र्यांच्या मतदार संघातील ग्रामीण रुग्णालयात तोडफोड; डॉक्टर, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ
तपासादरम्यान पोलिसांनी इमारतीचे सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यात शबनम आणि तिचा मुलगा डिकोस्टा यांच्या घरातून बाहेर पडताना दिसले. तसेच एक मास्कधारी व्यक्ती घरात शिरतानाही दिसली. संशय आल्याने पोलिसांनी शबनमला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान सर्व प्रकार उघडकीस आला. कारवाई करत पोलिसांनी शबनम, तिचा पती आणि मुलाला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed