• Fri. Mar 13th, 2026
    तरुण घरातून बेपत्ता झाला, घरातल्यांनी सगळीकडे शोधलं…; पण रेल्वे रुळावर जाऊन बघताच…

    छत्रपती संभाजीनगर:झेंडे चौक येथील रेल्वे रुळावर २७ वर्षीय तरुणाची धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवार दि. २० रोजी रात्री ११ वाजता उघडकीस आली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलदीप हिरालाल जैस्वाल वय २७ रा.मुकुंदवाडी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. कुलदीप मुकुंदवाडी परिसरामध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहतो. तो अविवाहित असून तो मजुरी करण्याचं काम करतो. दरम्यान कुलदीप सकाळी घराबाहेर गुरुवारी बाहेर पडला होता. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता नव्हता. घरच्यांनी खूप शोधाशोध केली. मात्र, त्याचा काहीच शोध लागला नाही.

    कामगाराला खोदकाम करताना मिळाला १३६ वर्ष जुना खजिना, रात्रभर झोपला नाही; दुसऱ्या दिवशी उठून…
    रात्री दहा वाजता झेंडा चौक येथील रेल्वे रुळावरती त्याचा मृतदेह आढळला. दरम्यान पोलिसांनी त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार दिगंबर धारबले करीत आहे.

    मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी, मुंब्रा बायपास बंद झाल्याने ठाण्यात वाहनांच्या रांगा

    नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed