• Sat. Sep 21st, 2024

आष्टी कडा बाजार समितीवर भाजपचा झेंडा, सुरेश धस किंगमेकर, राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

आष्टी कडा बाजार समितीवर भाजपचा झेंडा, सुरेश धस किंगमेकर, राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

बीड :आष्टी कडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठीचा नामांकन अर्ज काढून घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आष्टी- कडा बाजार समितीवर भाजपने एकहाती वर्चस्व मिळविले आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. १८ जागांपैकी १२जागा धस यांच्याकडे आहेत. तर भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना 3 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांना मात्र या निवडणुकीत धक्का बसला आहे. आजबे यांना केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. एकंदरीत बाजार समितीवर सुरेश धस यांची म्हणजेच भाजपची एकहाती सत्ता आली असून भाजपची राज्यातली पहिलीच बिनविरोध निवडणूक आहे. भाजपला कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ यश यानिमित्तानं मिळालं आहे.

नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये भाजप म्हणजेच आमदार सुरेश धस गटाचे रमजान शेठ तांबोळी ,संजय बलभीम ढोबळे ,अशोक मोहन पवार, रामशेठ बाळनाथ मधुकर, वंदना परिवंत गायकवाड ,बुवासाहेब सुभाष शेंडगे, राजू मुरलीधर हुलगे, संजय कांतीलाल मेहेर, जयश्री तळेकर शेंडगे रामदास भगवान, मुरलीधर फसले छाया अशोक लगड,तर माजी आमदार भीमराव धोंडे गडाचे नामदेव आनंदराव धोंडे ,अण्णासाहेब लांबडे, बीबीनंदा भगवान नागरगोजे यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, तुरीमुळं अच्छे दिन, दरवाढीचा ट्रेंड सुरु,९ हजारांचा टप्पा गाठणार?

आमदार बाळासाहेब आजबे व माजी आमदार साहेबराव दरेकर गटाचे पंडित पोकळे, मधुकर सायबर, राजेंद्र गव्हाणे हे बिनविरोध निवडून आले आहेत. आमदार सुरेश धस यांचे समर्थक १२ आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांचे समर्थक तीन असे १५ संचालक भारतीय जनता पार्टीचे असून विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समर्थक फक्त तीन संचालक या निवडणुकीमध्ये निवडण्यात आले आहेत.

जितेश शर्माच्या हुशारीसमोर विराट फसला, किंग कोहलीची अशी विकेट कोणी काढली नसेल

कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेले अनेक उपक्रम राबवले असून शेतकऱ्यांची संस्था म्हणून ओळखली जात असल्याने या ठिकाणी मतभेद न करता आम्ही निवडणूक बिनविरोध पार पाडावी यासाठी प्रयत्न केले आहेत, असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे.

पुण्यातील गुंड शरद मोहोळची पत्नी भाजपात, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed