• Sun. Jun 14th, 2026
    अक्षय्यतृतीयेला रत्नागिरी हापूस घरी आणताय? कोकणचा राजा आणि कर्नाटकी आंब्यातला फरक असा ओळखाल

    मुंबईःएप्रिल महिना सुरु झाला की बाजारात फळांचा राजा आंब्याची मागणी वाढते. एप्रिल आणि मे हे दोन महिने आंब्याचा हंगाम असतो. आता बाजारात पिवळ्याम्मक- आंब्यांनी ठाण मांडले आहे. महाराष्ट्रीयन नागरिकांबरोबरच इतर राज्यातील लोकांनाही कोकणी हापूसचं विशेष आकर्षण असते. खवय्ये वाट्टेल त्या किंमतीत रत्नागिरी हापूस व देवगड हापूस घेण्यास तयार असतात. खवय्यांचा हाच विक पॉइंट लक्षात घेऊन काही विक्रेते कर्नाटकी आंबा मुंबईकरांच्या गळ्यात मारत आहेत. कर्नाटकी हापूस आणि रत्नागिरी हापूस यातील फरक कसा ओळखाल हे जाणून घेऊया.२२ एप्रिल रोजी अक्षयतृतीया आहे. या दिवशी बाजारात आंब्याची मागणी वाढते. हाच मुहूर्त साधून बाजारात हापूस आंब्यांची आवकदेखील वाढते. सणासाठी तयार आंबा खायला मिळावा यासाठी घरगुती ग्राहकांसह विक्रेत्यांकडून मोठी मागणी असते. फळाच्या आकारानुसार बाजारात हापूस आंबा ८०० ते १००० रुपये डझन दराने विकण्यात येत आहे. तर, कर्नाटक हापूस आंबा ५५० ते ६५० रुपये डझन दराने विकला जातो. मात्र, तरी आंबा विक्रेत्यांकडून हापूससारख्या दिसणाऱ्या कर्नाटकी आंब्याची चढ्या दराने हापूस म्हणून विक्री केली.

    पिवळाधम्मक-केशरी आंबा दिसला की लगेच खरेदी करु नका, तुमची फसवणूक होऊ शकते, कारण…
    कर्नाटकी हापूसचा रंग, आकार रत्नागिरी हापूसशी मिळताजुळता असल्याने ग्राहकांची फसवणूक होते. अनेकदा विक्रेता कर्नाटकी हापूसचा भाव कमी करुन ग्राहकांना देतात. कर्नाटकी आंबा दिसायला हापूससारखा असला, तरी त्याला कोकणी हापूसची चव नसते. त्यामुळं घरी गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे ग्राहकांच्या लक्षात येते. त्यामुळं रत्नागिरी हापूस आणि कर्नाटकी हापूस या पद्धतीने ओळखा.

    लहरी हवामानाचा हापूसला फटका; आंब्यांच्या केवळ २५ हजार पेट्या दाखल
    रत्नागिरी हापूस आणि कर्नाटकी हापूसमधील फरक कसा ओळखाल

    रत्नागिरी हापूस आंबा गोलाकार असतो तसंच त्याची साल पातळ असते. तर, फळाच्या देठाकडे पिवळसर तर टोकाकडे लालसर किंवा केशरी असतो. रत्नागिरी हापूसचा वास लवकर पसरतो. रत्नागिरी हापूस कापल्यानंतर पिवळसर दिसतो.

    कर्नाटकी हापूस हा आकाराने उभट असतो आणि त्याची साल जाड असते. देठाचा भाग हिरव्या रंगाचा असतो. टोकाकडे पिवळसर असतो. कर्नाटकी हापूस आंब्याचा वास जास्त पसरत नाही. कर्नाटक हापूस कापल्यानंतर गडद केशरी रंगाचा दिसतो.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed