दीड एकर कलिंगडाची शेती करण्यासाठी त्यांना साधारण ७० ते ८० हजार रुपये खर्च आला आहे. या शेतीमधून साधारणत: ४० ते ४५ टन इतकं उत्पादन निघेल अशी शेतकऱ्याला आशा आहे.
शेतकऱ्याने अॅग्री फाईन या कंपनीबरोबर करार केला असून कंपनी त्यांच्याकडून मार्केटच्या किमतीपेक्षा चार ते पाच रुपये किंमत जास्त देऊन माल खरेदी करणार आहे. तसंच या कलिंगडाला पुणे, मुंबई, औरंगाबाद, बेंगलोर या ठिकाणी मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
मनु सिड्सचे तिनं कलिंगड हे आरोही, विशाला आणि सरस्वती असे आहेत. आरोही या वाणाचे कलिंगड वरून काळं आणि आतून पिवळा गर असलेलं आहे. याची चव अननसासारखी असून पाणीदार फळ आहे.
कडू कारलं ठरतंय वरदान; ३० गुंठ्यात कारल्यांची लागवड अन् शेतकऱ्याला लाखोंचा फायदा
विशाला या वाणाचे कलिंगड वरून पिवळं आणि आतून लाल गर असलेलं आहे. इतर कलिंगडापेक्षा हे जास्त गोड आहे. तर सरस्वती या वाणाचे कलिंगड वरून हिरवंगार आणि आतून लाल गर असलेलं आहे.
अॅग्रीफाय कंपनी मार्फत शेतकऱ्यांना बियाणे आणि रोप दिलं जातं. कंपनी मार्फत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं जातं. तसंच उत्पादन विक्री सुध्दा कंपनी मार्फत केली जाते. बाजार भावापेक्षा ४ ते ५ रुपये भाव वाढवून दिला जातो त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो. सध्या महाराष्ट्रात कंपनी मार्फत ३५ शेतकऱ्यांनी शेती केली आहे. पुढील वर्षी कंपनी मार्फत २०० ते ३०० शेतकरी जोडले जातील. अहमदनगर जिल्ह्यातील संदिप रोडे हे कंपनी बारोबर जोडले गेलेले पहिले शेतकरी आहेत.