• Mon. Nov 25th, 2024

    डोळ्यादेखत मोठा भाऊ बुडत होता, हतबल झालेल्या धाकट्याने तिथेच टाहो फोडला, दोघांचा मृत्यू

    डोळ्यादेखत मोठा भाऊ बुडत होता, हतबल झालेल्या धाकट्याने तिथेच टाहो फोडला, दोघांचा मृत्यू

    रत्नागिरी :रत्नागिरी शहराजवळ भाटे पुलाच्या खाडीजवळ दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यातील एक मुलगा अल्पवयीन आहे. मृतांमध्ये यामध्ये प्रणय जाधव (वय वर्षे २४) आणि रेहान अब्दुल्ला शेख ( वय वर्षे ११, रा. कोकण नगर) या दोघांचा समावेश आहे. सुदैवाने आठ वर्षांचा एक लहान मुलगा पाण्यात न उतरल्यामुळे बचावला आहे.डोळ्यादेखत भावाला बुडताना बघताना आठ वर्षांच्या मुलाने आरडाओरडा केला. यावेळी जवळच जाळी विणणाऱ्या लोकांनी या दोघांनाही पाण्याबाहेर काढले. त्यांना पाण्यातून बाहेर काढल्यावर त्यांच्या पोटातून पाणी बाहेर काढण्यासाठी लहान भाऊही धडपड करत होता. हतबल झालेल्या आठ वर्षांच्या मुलाला काहीच समजत नव्हतं. अतिशय मन हेलावून टाकणारी घटना आणि मन सुन्न करणारा हा सगळी प्रसंग होता. आज दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मतीन अमीरुद्दीन सोलकर (३८, रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांना माहिती दिली.

    भाट्ये पुलाच्या खाडीच्या तोंडाशी गाळ साचलेला आहे. तसंच पाण्याचा अंदाज न आल्याने रत्नागिरी कोकण नगर येथील हे दोन जण बुडाले. या दोघांच्याही मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दोघांसोबत असलेला ८ वर्षांचा एक मुलगा सुदैवाने पाण्यात उतरला नाही. यामुळे तो बचावला. पण या घटनेत त्याच्या अकरा वर्षांच्या सख्ख्या भावाचा दुर्देवीरित्या मृत्यू झाला.
    मोठी बातमी! मुंबई गोवा महामार्गावर आज अवजड वाहतूक बंद, हे आहे कारण
    शहरातील कोकण नगर येथे रहाणारा प्रणय जाधव हा आपल्या शेजारी रहाणारे अबकर शेख आणि रेहान शेख यांना घेऊन आज सकाळी १० वाजता फिरायला बाहेर पडला होता. शहरातील वरच्या भागात फिरून हे तिघे जण भाट्ये पुलावर आले. भाट्ये पूल संपल्यावर एक पाय वाट आहे. त्या पाय वाटेने तिघेजण खाली पुलाखालच्या भागात आले. पाण्यात आंघोळ करण्यासाठी प्रणय जाधव आणि रेहान शेखने कपडे काढले. पण अकबर शेख (वय वर्षे ८) याने पाण्यात उतरण्यास नकार दिला. मला पोहता येत नाही. मी पाण्यात येत नाही, असं त्याने सांगितलं आणि तो काठावरच उभा होता.
    रत्नागिरी शहर परिसर हादरला; मित्रानेच केले मित्रावर सुरीने सपासप जीवघेणे वार, कारण काय?
    पाण्यात पोहण्यासाठी उतरलेले या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. या ठिकाणी पाण्याची खोली जास्त आहे. ते बुडत असलेले पाहून अबकरने आरडाओरडा केल्यावर पुलावर जाळी विणत असलेले धावत खाली आले. त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण नाकातोंडात पाणी गेल्याने या दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. त्याचे ओरडणे ऐकून राजीवडा येथे राहणारे अमीरुद्दीन सोलकर यांनी दिलदार कासम पावसकर यांच्या मदतीने पाण्यात उडी मारली. त्यांनी रेहान शेख आणि प्रणय जाधव या दोघांनाही खाडीच्या पाण्यात बुडताना बाहेर काढले.

    हा सगळा धक्कादायक आणि दुर्दैवी प्रकार दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या दोघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणले. पण तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *