लोकसभा निवडणुकीमध्ये विजय शिवतरे यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जहरी टीका केली. शरद पवारांना तर “बहलोल खानाची” उपमा देखील त्यांनी दिली आणि याचाच राग मनात धरूनअजित पवार यांनी विजय शिवतरे यांना ‘आता कसा आमदार होतो तेच पाहतो;, असे म्हणत चारी मुंड्या चीत केले. त्यावेळी अजित पवार यांनी विजय शिवतरे यांचा पराभव अजित पवार यांनी सहज केला. त्यामुळे मागील अडीच वर्षात विजय शिवतरे यांना सक्रिय राजकारणापासून दूर राहावे लागले.
मात्र भाजप आणि शिंदेचे सरकार आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये पवार कुटुंबीयांना टक्कर देण्याचा विडाच जणू उचलला आहे. त्यामुळे आता ते बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, दौंड, इंदापूर या भागाचे दौरे करत आहेत. याभागतील दौरे करून शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करताना पहायला मिळत आहेत. शिवतारे यांचा पुरंदरमध्ये हा फॉर्मुला सध्या फ्लॉप ठरत असला, तरी बारामती दौंड, इंदापूर आणि भोर तालुक्यातील लोकांना शिवतारे यांच्या बद्दल आकर्षण असल्याचे वातावरण तरी निर्माण होत असल्याचे पहायला मिळत आहे. शिवतरे यांची बोलण्याची पद्धत आणि बेधडक भिडण्याची सवय यामुळे पवार विरोधक शिवतारे यांच्या भोवती पहायला मिळत आहे.
इंदापूर दौऱ्यावर असताना विजय शिवतारे यांनी केलेली अजित पवार यांची स्तुती, अजित पवार हे चांगले काम करणारा नेता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यातच अजित पवार यांची त्यांच्याच पक्षात घुसमट होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे अजित पवार यांनी शिंदे यांच्या सेनेसोबत यावे अशी ऑफरच शिवतारे यांनी दिली आहे. त्यामुळे अजित पवार यांची स्तुती सुमने म्हंजे शिवतारे पुरंदरची साखर पेरणी असल्याचे बोलले जात आहे.