परभणी :पुतण्याला थापड बुक्क्याने मारहाण करताना भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या काकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या मानवत शहरामध्ये घडी आहे. याप्रकरणी पुतण्याने दिलेल्या फिर्यादीवरून एकूण १२ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मानवत शहरातील गरुड चौक भागामध्ये घडली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.परभणीच्या मानवत शहरातील कोकर कॉलनी येथे राहणाऱ्या हरभजन सिंग जगदीश सिंग टाक याला मानवत शहरातील गरुड चौक येथे काही जण मारहाण करत असल्याची माहिती हरभजन सिंग यांचे चुलते हरजीत सिंग टाक यांना मिळाली होती. त्यामुळे ते भांडण सोडवण्यासाठी मानवत शहरातील गरुड चौक येथे गेले असता त्यांच्या पुतण्याला १२ जण थापड बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे दिसून आले.
त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता सदरील १२ जणांनी त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यामुळे हरजीतसिंग टाक यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हरभजन सिंग जगदीश सिंग टाक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेशसिंग दरबार बावरी, आयासिंग खानसिंग बावरी, रुबाबसिंग मूलगसिंग बावरी, बरसातसिंग आयासिंग बावरी, बलिंदरसिंग बल्लूसिंग बावरी, रवींद्रसिंग रणजितसिंग टाक, लखनसिंग दिपूसिंग जुनी , भगतसिंग अयसिंग बावरी, पवनसिंग गब्बुसींग बावरी , हरदयालसिंग जवहरर्सींग बावरी , भीमसिंग टिपूसिंग जुनी ,दीपसिंग रुबाबसिंग बावरी (सर्व राहणार पाथरी नाका, मानवत) अशी आरोपींंची नावे आहेत.
या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कापूर हे करत आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळतात मानवत पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.