नागपूर :सावनेर रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली असून, रेल्वेची धडक बसून तीन तरुण जखमी झाले आहेत. या जखमी तरुणांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने तिघांनाही उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आले आहे. जखमींपैकी दोन तरुणांची प्रकृती चिंताजनक आहे. राजेश चंदू वंशकर ( वय २० वर्षे), हिरा बाबुलाल झा ( वय २५ वर्षे) आणि हिरेंद्र रघुवीर करण (वय २५ वर्षे) अशी जखमींची नावे आहेत. तिघेही उचाड तहसील इंदरगड जिल्हा दतिया, मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत. हा अपघात पहाटे घडला.मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघे तरुण आपल्या गावी परतण्यासाठी सावनेर रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते. रेल्वे न मिळाल्याने ते रेल्वे स्थानकापासून नागपूरच्या दिशेने थोड्या अंतरावर रुळांच्या बाजूला ठेवलेल्या गिट्टीवर बसले होते. पहाटे साडेचारच्या सुमारास नागपूरहून छिंदवाड्याला जाणाऱ्या रेल्वेने धडक दिल्याने ते तिघेही जखमी झाले.
या अपघातात राजेश वंशकर किरकोळ जखमी झाले असून, हीरा झा आणि हिरेंद्र करण यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातात राजेश वंशकर किरकोळ जखमी झाले असून, हीरा झा आणि हिरेंद्र करण यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
तिन्ही तरुण दारूच्या नशेत होते
या भीषण दुर्घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बहुधा तिघेही तरुण दारूच्या नशेत बसले होते. जास्त नशेमुळे त्यांना समोरून येत असलेली ट्रेन दिसत नव्हती. त्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासानंतर हे प्रकरण रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.