लोणावळा :जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत पडून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. लोणावळ्याजवळ असलेल्या बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने ही बस निघाली होती, यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.सध्या बसमधील १६ जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी प्रवासी बसमध्ये अडकलेले असल्याची शक्यता वर्तवली जात असून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.
दोस्ताच्या लग्नाला जाताना काळाचा घाला, कारची बाईकला धडक, दोघा मित्रांसह तिघांचा मृत्यू
जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील अपघात वाढत असून आज पहाटेच्या सुमारास झालेला अपघात अत्यंत भीषण आहे. चालकाचे नियंत्रण सुटून बस दरीत कोसळल्याची शंका आहे. बसमध्ये ३० हून अधिक प्रवाशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.रायगडच्या माणगावमध्ये भीषण अपघात, कार आणि ट्रकच्या धडकेत नऊ जणांचा मृत्यू
या अपघाताने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बस पुण्याहून मुंबईकडे निघाली होती. अचानक झालेल्या अपघाताने प्रवाशी गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. पुणे एक्स्प्रेस वे वर अपघाताची मालिका सुरू असताना आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महामार्गावर चालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅट नं. ६०२; पोलिसांची छापेमारी, काळे धंदे पाहून चक्रावले