जवळचा पैसा संपला तसे त्याने उसने पैसे घेण्यास सुरुवात केली. शेवटी हतबल झालेल्या परमेश्वरने आपली शेत जमीनही विकली. वर्षभरात या व्यासानापायी त्याचे ऑनलाइन गेममध्ये ४० लाख रुपये डूबले. मॉस्ट बेट हा गेम एका परदेशी कंपनीनं तयार केला आहे. त्याला भारतात खेळण्यास परवानगी नाही. प्ले स्टोअरवर हा गेम उपलब्ध नसून तो खेळणाऱ्याला लिंकद्वारे डाऊनलोड करावा लागतो. यामध्ये गेमिंगचे अनेक प्रकार आहेत.
सुरुवातीला हा खेळणाऱ्याला बोनसचं अमिष दाखवून गेम खेळण्यास भाग पाडतो आणि खेळणारा आपणहून या गेमच्या आहारी जाऊन सर्वस्व गमावून बसतो. या गेमच्या नादात आपली शेत जमीन हातची गेल्यावर कुठे परमेश्वरचं डोकं ताळ्यावर आलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच परमेश्वरने थेट पोलिसात धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करून न घेता सायबर पोलिसांनी त्याला बँक स्टेटमेंट आणण्याचा सल्ला दिला.
जालना जिल्ह्यातल्या या छोट्याशा गावात ३५ ते ४० मुलं या ऑनलाइन गेमचे बळी पडले आहेत. या गावातील तरुण पोरं वेगवेगळ्या पद्धतीचे ऑनलाईन गेम खेळतात. त्यात अनेकांचे खिसे रिकामे करून झाले आहेत. परमेश्वरनी ऑनलाइन गेमच्या नादात त्याची रस्त्यालगत असलेली शेत जमीन विकली असून सध्या त्याची परिस्थिती हलाखीची आहे. गावातच एका छोट्या टपरीवर त्याच्या घरचा उदरनिर्वाह भागतोय. या व्यसनापाई राजाचा रंक झाल्याचं त्याला आता कळू लागलं आहे.
पूर्वी शब्दाला किंमत होती, आता लोक फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार करतात; अजितदादांनी खंत बोलून दाखवली