अतिक मागील वर्षी त्याच्या आत्याचा घरी आला होता. तिथेच त्याच्यात आणि मंतशामध्ये जवळीक वाढली. त्यानंतर दोन्ही परिवारांनी त्यांचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नव्हे तर, अतीक अहमद गुजरात असताना बहिणीच्या नवऱ्यासोबत त्यांची लग्नासंबंधी चर्चा झाली होती. त्यानेही दोघांच्या नात्याला परवानगी दिली होती.
दरम्यान, उमेश पाल हत्याकांडात अतीक अहमदची बहिण आणि तिचे पती व दोन भाच्यांनाही या प्रकरणात आरोपी बनवण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपपत्रात म्हटल्याप्रमाणे, अतीकच्या बहिणीने व तिच्या दोन्ही मुलींनी आरोपींना पळून जाण्यास मदत केली. त्यामुळं या हत्याकांडात त्यांना आरोपी केले आहे. सध्या अतिकची बहिण व तिचा संपूर्ण परिवार फरार आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांच्या हत्याप्रकरणातील साक्षीदार उमेश पाल याची व त्याच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या दोन पोलिसांची २४ फेब्रुवारीला प्रयागराजमध्ये दिवसाढवळ्या हत्या झाली होती. उमेश पाल याच्या हत्येच्या आरोपाखाली अतिक अहमद, त्याचा भाऊ अश्रफ, मुलगा असद व साथीदार गुलाम यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. अन्य काही गुन्ह्यांसाठी गुजरातच्या साबरमती तुरुंगात असलेला अतिक व बरेलीच्या तुरुंगात असलेला अश्रफ यांना या हत्येनंतर प्रयागराज तुरुंगात ठेवण्यात आले; तर फरार असलेल्या अतिक व गुलामवर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. त्यांच्या मागावर असलेल्या विशेष कृती दलाच्या पोलिस पथकाला ते झाशी येथे मोटारसायकलीवरून जाताना दिसले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोघेही ठार झाले. त्यांच्याकडे अत्याधुनिक विदेशी शस्त्रे सापडली आहेत.