• Sat. Sep 21st, 2024
नवी मुंबईत २० वर्षीय विवाहितेने जीवन संपवलं, पुणेकर तरुणाच्या एकतर्फी प्रेमातून टोकाचं पाऊल

नवी मुंबई : प्रेम संबंधातून घडणाऱ्या भयंकर घटनांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एकतर्फी प्रेमसंबंधातून अनेक वेळा महिला टोकाचे पाऊल उचलतात. अशीच एक घटना नवी मुंबईतील घणसोली परिसरामध्ये घडल्याचे पाहायला मिळत आहे. विवाहित महिलेला ओळखीच्या तरुणाकडून मोबाईलवर वारंवार अश्लील मेसेज, शिवीगाळ आणि फोन येत होते. हे प्रकरण महिलेच्या पतीच्या ध्यानात आल्यावर त्याने तिच्याच चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाचा होणारा मानसिक त्रास सहन न झाल्याने घणसोलीत राहणाऱ्या विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

विवाहित महिलेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तिच्या मोबाईल फोनची तपासणी केल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला आहे त्यानुसार रबाळे पोलिसांनी मृत महिलेच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या अर्जुन दगडू पोळ (वय २५ वर्ष) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील २० वर्षीय मयत विवाहित महिला आणि तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा आरोपी अर्जुन पोळ दोघेही पुण्यात राहण्यास होते. अर्जुन पोळ तिच्या घराशेजारीच राहत असल्यामुळे या दोघांच्या कुटुंबीयांमध्ये चांगला संवाद होता, मात्र अर्जुन सदर तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता.

मे २०१९ मध्ये विवाह झाल्यानंतर ती आपल्या पतीसह घणसोली येथे राहण्यास आली होती. या प्रकरणामुळे दुखावलेल्या अर्जुन पोळने तिच्या मोबाईलवर फोन करून तसेच तिला मेसेज पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली. सदर प्रकार तरुणीच्या पतीच्या लक्षात आल्यानंतर त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे या दोघा पती-पत्नीमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. डिसेंबर महिन्यामध्ये या तरुणीला तिच्या वडिलांनी माहेरी पुणे येथे नेले होते. त्यावेळी तरुणीने अर्जुन पोळकडून होत असलेल्या त्रासाबाबत माहिती दिली होती. त्यामुळे तरुणीच्या वडिलांनी अर्जुन पोळ आणि त्याच्या भावाला आपल्या मुलीला त्रास न देण्याबाबत समज दिली होती.

बाबा फोन उचलत नाहीयेत रे, मुंबईहून मुलाचा मित्राला फोन, घरी जाऊन पाहिलं तर आक्रित घडलेलं
त्यानंतर वडिलांनी सदर तरुणीला पुन्हा घणसोली येथे सासरी आणून सोडले होते. मात्र त्यानंतर देखील अर्जुन पोळ पीडित तरुणीच्या मोबाईलवर वारंवार मेसेज आणि फोन करून त्रास देत होता. अर्जुनच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने २२ फेब्रुवारी रोजी घणसोली येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणीच्या आत्महत्येनंतर रबाळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून सदर प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती.

‘ती न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देऊन निघून गेली’ म्हणत पतीने मुलीसह जीवन संपवलं

या तपासादरम्यान पोलिसांनी मृत तरुणीच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता ज्या दिवशी या तरुणीने आत्महत्या केली त्या दिवशी अर्जुन पोळ याने तिला अनेक कॉल केल्याचे तसेच तिला बरेचसे शिवीगाळ केलेले मेसेज पाठवल्याचे आढळून आले. अर्जुन पोळकडून होत असलेला त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केल्याचे आढळून आल्यानंतर तिच्या वडिलांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ज्या मित्राच्या घरी जेवला, त्याचाच जीव घेतला, मजामस्तीत एक गोष्ट ठरली दोस्तीत कुस्तीचं कारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed