• Sat. Sep 21st, 2024

थोडक्यात टळला अनर्थ! बेस्टमधून प्रवास करताना प्रवाशाला दिसलं असं काही की भीतीने काळीजच गोठलं

थोडक्यात टळला अनर्थ! बेस्टमधून प्रवास करताना प्रवाशाला दिसलं असं काही की भीतीने काळीजच गोठलं

मुंबईः बसमधून प्रवास करत असताना एक प्रवाशांसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतून प्रवासी थोडक्यात बचावला आहे. बेस्ट बसमध्ये असलेल्या रिकाम्या जागेत बसवलेली स्टीलची प्लेट निखळून बाहेर आली होती. सुदैवाने ही गोष्ट वेळीच लक्षात येताच तो तिथून बाजूला झाला. नाहीतर मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले असते.बेस्टमध्ये असलेली ती प्लेट निखळून बाहेर आली होती. मी अजून त्यावर थोडावेळ उभा राहिलो असतो तर मी तिथून खाली पडलो असतो. मात्र सुदैवाने मला वेळीच लक्षात आलं अन् मी तिथून बाजूला झालो. मी बाजूला होताच स्टीलची प्लेट तिथून निखळली, असं प्रवाशाने म्हटलं आहे. अॅन्थनी ग्रॅसियस असं या प्रवाशाचे नाव आहे.

प्रवाशाने बेस्ट प्रशासनाकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. तसंच, या घटनेचा व्हिडिओही बेस्ट प्रशासनाला दाखवला असून गुरुवारी सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बेस्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशाने दाखल केलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. तसंच, मार्वे मालाड आगारातून बाहेर पडणाऱ्या बसेसची योग्य ती तपासणी करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

नोकरी अन् छोकरीही मिळेल, पण…; ज्योतिषी बाबाच्या भयंकर सल्ल्याने तरुण चक्रावला, काय घडलं?
एका सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड परिसरात जुन्या बेस्ट बस चालवण्यात येतात. या बेस्ट बस बदलून आता त्याजागी एसी बस चालवण्यात याव्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

घराला चारही बाजूने आगीचा वेढा, आत पाच भावंड, मोठ्या ताईने धुमसत्या आगीत उडी घेत वाचवला जीव

कॉंग्रेसमध्ये अशोक चव्हाणांची गळचेपी, त्यामुळे लवकरच भाजपमध्ये येणार; संजय शिरसाटांचा दावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed