ओळख पटविण्यासाठी कुटुंबिय रुग्णालयात पोहचले अन्…
दुसरीकडे बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास जळगाव तालुक्यातील निमखेडी तालुक्यातील गावानजीक एका अनोळखी वृद्धाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अनिल फेगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. हातात सुभाष नाव गोंदलेले होते, त्यानुसार पोलिसांनी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन केले, याबाबतची माहिती बेपत्ता असलेल्या सुभाष कोळी यांच्या कुटुंबियांना मिळाली. त्यानुसार कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालय गाठले.
अल्पवयीन मुलीचा ५० हजारात सौदा; मनसे म्हणाली, ‘जिथे गरज पडेल तिथे दांडा नक्की बाहेर काढू!’
मयत व्यक्ती ही सुभाष कोळी असल्याची ओळख पटल्यानंतर कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात मन हेलावणारा आक्रोश केला. सुभाष कोळी यांनी आत्महत्या केली की त्यांचा बुडून मृत्यू झाला याबाबतची नेमकी माहिती समोर आलेली नाही. गुरूवारी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत सुभाष कोळी यांच्या पश्चात पत्नी सखुबाई, गणेश, समाधान आणि सुनिल असे तीन मुले आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.