• Sun. Sep 22nd, 2024

पोलीस कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा; बंदूक हाताळताना अचानक दाबला गेला ट्रिगर, गोळी सुटली आणि…

पोलीस कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा;  बंदूक हाताळताना अचानक दाबला गेला ट्रिगर, गोळी सुटली आणि…

नांदेड : आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बंदूक हाताळने एका पोलीस कर्मचाऱ्याला चांगलेच अंगलट आले आहे. बंदूक हाताळण्याचा प्रयत्न करत असताना कर्मचाऱ्याच्या हातून बंदुकीचा ट्रिगर अचानक दबला गेला आणि बंदूकीतून सुटलेली गोळी जमिनीला लागली. बुधवाऱी सकाळी नांदेड कारागृह परिसरात ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण गोळीबाराच्या या घटनेने नांदेड शहर पुन्हा हादरलं आहे.कारागृहातील आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे काम पोलीस मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी करत असतात. आरोपींना न्यायालयात हजर करण्यापासून ते त्यांना कारागृहात परत आणण्याची जवाबदारी या पोलीस अधिकाऱ्यावर असते. बुधवारी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक के. एच. आरेवार हे आरोपीना न्यायालयात हजर करण्यासाठी करागृहात गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा राईटर गिते आणि पोलीस कर्मचारी जरांडे हे देखील होते.

महिलांनी लाटल्या साडे तीन लाख पुऱ्या, १ हजार किलो कांद्याची चटणी ; पुण्यातील या गावात केला जातो महाप्रसाद
कारागृहाच्या आत जात असताना पोलिसांना बंदूक नेण्याची परवानगी नसते. त्यामुळे आरेवार यांनी आपल्या जवळील बंदूक राईटर गीते यांच्याकडे दिली. त्यानंतर जरांडे यांनी ही बंदूक घेऊन हाताळण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान बंदूकीचा ट्रिगर अचानक त्या कर्मचाऱ्याकडून दबला गेला आणि बंदुकीतून सुटलेली गोळी थेट जमिनीला लागली. सुदैवाने गोळी जमिनीला लागल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू; वीज कर्मचाऱ्यानेच शेतकऱ्याला खांबावर चढायला लावले?
घटनेनंतर पोलीस उप निरीक्षक आरेवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लेखी जवाब दिला. पोलीस कर्मचारी जरांडे यांच्या हातून चुकीने हा गोळीबार झाल्याच आरेवार यांनी आपल्या लेखी जवाबात सांगितले आहे. दरम्यान या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याची चौकशी देखील सुरू केली आहे.

Breaking अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, जामीन मिळणार की तुरुंगात जाणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed