• Sat. Sep 21st, 2024
लॉज नाही, त्याच्या खालच्या हॉटेलात बघा, पोलिसांना टीप; छाप्यात दोघे ताब्यात, औषधंही जप्त

बुलढाणा : चक्क हॉटेलमध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांना बुलढाणा शहर पोलिसांनी काल दुपारी ताब्यात घेतले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील एका हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे. यावेळी त्यांच्याजवळ असलेला मोठ्या प्रमाणावरील औषध साठाही जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात विकमसी चौकातील एका लॉजच्या खाली असलेल्या हॉटेलात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार सुरू असल्याची तक्रार आरोग्य विभागाकडे करण्यात आली होती. यावरून सामान्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशन गाठले. यानंतर पोलीस व सरकारी वैद्यकीय अधिकारी पथक काल दुपारी विकमसी चौकातील लॉजच्या खाली एका हॉटेलमध्ये रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचले.

दहा वर्षांनी लहान प्रियकराशी अनैतिक संबंध, अखेर लॉजच्या बाथरुममध्ये विवाहितेने गमावला जीव
त्यानंतर शहर पोलीसांच्या पथकाने दोन डॉक्टरांसह येथून मोठ्या प्रमाणात औषध साठा जप्त केला. दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार महावीरसिंह आणि अरविंद कुमार अशी ताब्यात घेतलेल्या डॉक्टरांची नावे आहेत.

पोलीस भरतीची लेखी परीक्षा पारदर्शक; खुल्या मैदानावर बैठक व्यवस्था तर 20 पेक्षाही अधिक कॅमेरे तैनात

बुलढाणा शहर पोलीस निरिक्षक शांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पंकज सपकाळे आणि शहर पोलीसांनी ही धडक कारवाई केली. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून शहर व परिसरातील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.

४५ वर्षांची मामी २४ वर्षीय भाच्याच्या प्रेमात, सुटकेच्या नादात आणखी फसली, ‘ते’ फोटो व्हायरल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed