सोशल मीडियावर सध्या एका शाळकरी मुलीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्या मध्ये शाळकरी मुलगी ही बैलगाडी शर्यतीत बैलांपुढे घोडी पळवत आहे. बैलगाडा शर्यतीत बैलांपुढे घोडेस्वारी करायला भल्या भल्याना घाम फुटतो. रामनवमी दिवशी पुणे जिल्ह्याच्या केंदूर घाटामध्ये इयत्ता ९ शिकणाऱ्या मुलीने बैलगाडी पुढे घोडस्वारी करून उपस्थितांचं मन जिंकलं. शर्मिला दीपक शिळीमकर असा त्या मुलीच नाव आहे. पुण्यातील हुजूरपागा ती शाळेत शिकत आहे, शर्मिलाच्या या शौर्यामुळे तिची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा होऊ लागली आहे.
शर्मिला हिला घोडस्वारी करायची आवड असून तिने सोशल मीडियावर बैलगाडा शर्यतीचे व्हिडिओ पाहिले होते. व्हिडिओ मध्ये सगळे पुरुष घोडेस्वारी करत होते, मात्र कुठली मुलगी त्यामध्ये घोडेस्वारी करताना दिसत नव्हती, म्हणून तिने बैलगाडा शर्यतीत घोडेस्वारी करायचं ठरवलं. रामनवमी दिवशी तिने घोडेस्वारी केली. हे करण्यासाठी मोठं धाडस लागत. चांगल्या चांगल्या घोडेस्वारी करणाऱ्या माणसांना घाम फुटतो.मात्र, ठरलं तर मागे नाही हटायचं असं ठरवून अवघ्या काही सेकदांत तिनं घोडेस्वारी करून दाखवली आहे.