• Mon. Nov 25th, 2024
    आकडा आणि काट्याचं बंटींनी नातं सांगितलं तर महाडिक म्हणतात, खोट दाखवा अन् दोन लाख बक्षीस मिळवा

    म.टा. प्रतिनिधी कोल्हापूर : आकडा आणि काटा यांच्याशी महाडीक यांचे जवळचे नाते आहे. या दोन्हीत फेरफार करून आजपर्यंत महाडिकांनी जिल्हातील सहकारी संस्था लुटल्या. राजाराम कारखान्यातही याच माध्यमातून सभासदांना लुटणाऱ्या महाडिकांना कारखान्यातून हद्दपार करा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. तर राजाराम कारखान्याच्या वजन काट्यावर अचूक वजन येते याची सभासदांना खात्री आहे. त्यामुळे स्वतःच्या कारखान्यावर मापात पाप करणाऱ्यांनी राजाराम कारखान्याच्या वजन काट्याबाबत बोलू नये, असं सांगतानाच वजन काट्यात खोट दाखवा अन् दोन लाख बक्षीस मिळवा, असं प्रत्युत्तर अमल महाडिक यांनी बंटी पाटलांना दिलंय.राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या प्रचारार्थ सांगवडे, सांगवडेवाडी, वसगडे, मुडशिंगी, चिंचवाड व वळीवडे भागातील सभासदांशी संवाद साधला. आ.सतेज पाटील म्हणाले, सहकारी संस्था टिकण्यासाठी आणि सभासदांच्या ऊसाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. गेल्या २८ वर्षात महाडिकांनी राजाराम कारखान्याच्या विकासासाठी कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर मात्र त्यांना सभासदांची आठवण झाली आहे. सभासदांनी त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपली ताकद दाखवून देऊन शाहू परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करावे.

    त्यांचा बेईमानी आणि फितुरीचा इतिहास, कारखान्याची सत्ता दिली तर सभासदाला पण टोल लावतील, महाडिकांचा घणाघात
    स्वतःच्या कारखान्यावर मापात पाप करणाऱ्यांनी वजन काट्याबद्दल बोलू नये : अमल महाडिक

    राजाराम कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे. शेतकऱ्याच्या ऊसाला वेळेवर तोड देऊन दिलासा दिला आहे. राजाराम कारखान्याच्या वजन काट्यावर अचूक वजन येते याची सभासदांना खात्री आहे. त्यामुळे स्वतःच्या कारखान्यावर मापात पाप करणाऱ्यांनी राजाराम कारखान्याच्या वजन काट्याबाबत बोलू नये असा टोला अमल महाडिक यांनी लावला.

    थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय… २९ उमेदवार अपात्र केल्यावर बंटी पाटील इरेला पेटले!
    हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे झालेल्या राजारामच्या सभासदांच्या बैठकीत ते बोलत होते. राजाराम कारखान्याच्या वजन काट्याच्या वजनात चूक दाखवा मी दोन लाख रुपये बक्षीस द्यायला तयार आहे असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले.

    कितीही प्रयत्न करा, वर्षभरात विस्तारीकरण करणारच, महाडिकांचं बंटी पाटलांना चॅलेंज
    विरोधकांच्या कारखान्यात बाराशे किलोचा एक टन मोजला जातो अशी चर्चा असल्याचेही महाडिक यांनी नमूद केले. आम्ही सभासदांना अल्पदरात देत असलेली साखर पाहून विरोधकांचे तोंड कडू झाले आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *