• Mon. Nov 25th, 2024

    बुलढाण्यात भीषण अपघात; लेकीच्या डोळ्यांदेखत वडिलांचं डोकं ट्रकच्या चाकाखाली चिरडलं गेलं

    बुलढाण्यात भीषण अपघात; लेकीच्या डोळ्यांदेखत वडिलांचं डोकं ट्रकच्या चाकाखाली चिरडलं गेलं

    बुलढाणा: जिल्ह्यातील मेहकर परिसरात रविवारी मोटारसायकल आणि आयशरची धडक होऊन झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये वडील आणि मुलगी जायबंदी झाले होते. त्यापैकी वडिलांचा (वय ४५) मृत्यू झाला असून मुलीला (वय १३) गंभीर दुखापत झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यातील ब्रह्मपुरी हिवरा आश्रम येथील गजानन पांडुरंग मस्के आणि त्यांची मुलगी कु.भक्ती गजानन म्हस्के हे मेहकर वरून हिवरा आश्रम येथे जात होते. त्यांची मोटारसायकल नांद्रा धांडे फाट्यानजीक आली तेव्हा रस्त्याच्या कडेला उभ्या असणारा आयशर ट्रक अचानक समोर आला. मोटारसायकल वेगात असल्याने गजानन म्हस्के यांची दुचाकी आयशर ट्रकवर आदळली. ही धडक झाल्यानंतर गजानन म्हस्के नेमके ट्रकच्या खाली आहे. आयशर ट्रकचे मागचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    गुरं घेऊन शेताकडे निघाला पण आपल्याच धुंदीत होता, रेल्वेची धडक बसली अन् जागेवर प्राण सोडले…

    तर दुचाकी वर वडिलांच्या पाठीमागे बसून असलेली भक्ती रस्त्यावर फेकली गेली. भक्तीचा एक हात फ्रॅक्चर असून तिच्या छातीला जबर मार लागला आहे. तिच्या छातीच्या फासळ्या फ्रॅक्चर झाल्या आहेत. तिला छत्रपती संभाजी महाराज नगर येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले आहे. गजानन मस्के यांच्या पश्चात पत्नी ,भाऊ, दोन मुली व मुलगा असा आप्त परिवार आहे. सुस्वभावी असलेल्या गजानन मस्के यांचे हिवरा आश्रम येथे जनरल स्टोअर्स आहे. त्यांच्या अपघाती मृत्युमुळे हिवरा आश्रम ब्रह्मपुरी गावावर शोककळा पसरली आहे.

    समृद्धी महामार्गावर कारची ट्रकला धडक: भीषण अपघातात २ डॉक्टर तरुणींसह आणखी एकाचा जागीच मृत्यू

    दुचाकी वाहन घेऊन आपण शहरामध्ये जाऊन आपले कामे उरकून घेण्याकरिता, दळणवळणासाठी आपण दुचाकीचा याचा वापर करतो. अनेकदा आपल्यासोबत लहान मुलेही असतात . त्यामुळे राष्ट्रीय महामार्गवर वाहन चालवताना सावध राहणे आवश्यक आहे .वेळोवेळी यावेळी रस्ते महामार्ग विभागाकडून सूचना दिलेल्या असतात अनेक वेळा वाहन चालवताना याचे भान राहत नाही. आणि शेवटी घडतो अनर्थ. त्यामुळे मुख्यतः वर्दळीच्या रस्त्यावर सावदता बाळगणे आवश्यक आहे असे म्हटलं तर अवघड ठरणार नाही.

    ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रीकरणावेळी दरीत कोसळलेल्या युवकाचा मृत्यू

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed