या घटनेतील पीडित मुलगा व संशयित अल्पवयीन मुले ही साताऱ्यातील आहेत. पतंग उडवायला जात असताना पीडित मुलाची संशयित मुलांशी ओळख झाली. साधारण तीन वर्षापूर्वी ओळख झाल्यानंतर अल्पवयीन दोन्ही मुलांनी फिर्यादी लहान मुलाला वेळोवेळी भीती दाखवली. पैसे मागून ते न दिल्यास कुटुंबीयांना व्हिडिओ फोटो दाखवू तसेच कोणाला काही सांगितले तर कुटुंबातील लोकांना ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून वेळोवेळी यवतेश्वर, वाढे फाटा आणि उरमोडी धरणाजवळ खंडणी मागून तसेच मारहाण करून त्याच्याकडून रोख व ऑनलाईन पद्धतीने पैसे घेतले. या घटनेतील पीडित मुलगा व संशयित अल्पवयीन मुले ही सातारा शहरातील आहेत.
अल्पवयीन मुलगा जानेवारी महिन्यापासून काहीच बोलत नव्हता. यामुळे कुटुंबीय टेन्शनमध्ये होते. त्याला त्यांनी वेळोवेळी विश्वासात घेवून विचारण्याचा प्रयत्न केला. गेल्या आठवड्यात त्याला कुटुंबातील सदस्यांनी विश्वासात घेतले. त्यानंतर त्याने तीन वर्षांपासून घडत असलेल्या घटनेची माहिती पालकांना दिली. पालकांनी तात्काळ पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. संशयित मुले १७ वर्षांपेक्षा अधिक व १८ वर्षांपेक्षा लहान असल्याचे प्राथमिक स्वरुपात समोर आले आहे. तरीही ती मुले अल्पवयीन आहेत का? याची खातरजमा पोलिस करत आहेत. त्यानंतर पुढील कार्यवाही करणार आहेत.
दरम्यान, मागील आठवड्यात सातार्यातील एका शाळेसमोर किरकोळ कारणावरुन शाळकरी मुलाला संशयित अल्पवयीन मुलाने उलटा कोयता करुन मारहाण केली होती. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तक्रारदार मुलगा १६ वर्षीय असून तो नववीमध्ये शिकत आहे. या घटनांवरून शाळकरी मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे, हे निदर्शनास येत आहे.
अल्पवयीन मुलीचा ५० हजारात सौदा; मनसे म्हणाली, ‘जिथे गरज पडेल तिथे दांडा नक्की बाहेर काढू!’