• Mon. Nov 25th, 2024

    Pune : मावळमधील शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, चौघांना अटक

    Pune : मावळमधील शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, चौघांना अटक

    मावळ, पुणे : मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करत हत्या केली होती. शिरगावमध्ये भर चौकात ही हत्या केली होती. प्रवीण गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले होते. त्यांच्या हत्येच्या घटनेत आता मोठी अपडेट समोर येत आहे. हत्येप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या पोलीस पथकाने चार संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांना आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.महेश भेगडे (रा. तळेगाव), मनीष ओव्हाळ (रा. जांभूळ), अशोक कांबळे (रा. कांब्रे) आणि अमोल गोपाळे (रा. शिरगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रवीण यांचे भाऊ रवींद्र गोपाळे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींना सहा एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

    मावळ तालुक्यातील आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच आहे. सरपंच प्रवीण गोपाळे यांची हत्या करण्यापूर्वी हल्लेखोरांनी रेकी केल्याची माहिती समोर येत आहे. संबधित व्यक्ती प्रवीण गोपाळे असल्याची खात्री पटल्यानंतरच त्यांनी त्यांच्यावर हल्ला करत सपासप वार केले. आपला जीव वाचवण्यासाठी ते धावत होते. वार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलले असताना गोपाळे यांना नागरिकांनी रुग्णालयात नेले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

    फडणवीस म्हणाले गुन्हेगारी कमी झाली, रोहित पवारांनी थेट ‘त्या’ हल्ल्याचा VIDEO पुरावा दाखवला
    शिरगाव हे प्रतिशिर्डी म्हणूनही ओळखले जाते. आणि या हत्येच्या घटनेने मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची पिंपरी चिंचवड पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने चार संशयितांना ताब्यात घेतले. गोपाळे यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. त्यातूनच त्यांची हत्या केल्याच्या संशय पोलिसांना आहे. मात्र तपास झाल्यावर खरे कारण समोर येईल. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्याचा आधार घेत पोलिसांकडून तपास केला जात आहे.

    ना राडा, ना गोंधळ; गौतमीचा कार्यक्रम पहिल्यांदाच शांततेत पार पडला; गावाचं परफेक्ट नियोजन

    पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. सर्व शक्यता पोलीस तपासून पाहत आहेत. त्यातून लवकरच सत्य समोर येईल. असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *