• Sat. Sep 21st, 2024
प्रेयसी म्हणाली घरच्यांना सोड, प्रियकराची नदीत उडी; ८ महिन्यांपासून शोध, अक्षय अजून जिवंत?

अकोला : अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पुलावरून २५ वर्षीय तरुणाने नदीत उडी घेतली. अक्षय गजानन ताथोड (वय २५ राहणार, मोठी उमरी, अकोला) असं नदीत उडी घेतलेल्या या तरुणाचं नाव आहे. हा प्रकार घडला होता ५ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास. मात्र अजूनही अक्षयचा शोध लागलेला नाही. आज ७ महिने २५ दिवस उलटले, तरीही अक्षयचा ना मृतदेह हाती लागला, ना त्या संदर्भात कुठली माहिती आली. अख्खं कुटुंब आजही अक्षयच्या प्रतीक्षेत आहे.

प्रेयसीचा लग्नाला नकार

आई-वडिलांना सोड तेव्हाच लग्न करणार, अशी अट अक्षयच्या प्रेयसीने घातली होती. त्यानंतर सर्व काही सुरळीत सुरू होतं. मात्र, परत तिने लग्नाला नाही म्हटलं अन् रिलेशनशिपमध्येच राहायचं, असा हट्ट धरला. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे, अन् या वादातून अक्षयने भयंकर पाऊल उचललं. नदीच्या पुलावरून उडी घेत त्याने आपलं जीवन संपवलं. मात्र, अजूनही आपला मुलगा जिवंत असावा, असा विश्वास अक्षयच्या कुटुंबीयांना आहे.

१५ ते २० दिवस चालली शोधमोहीम

अक्षयने ५ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अकोट-अकोला मार्गावर असलेल्या गांधीग्रामच्या पूर्णा नदीच्या पुलावर आपली मोटार सायकल उभी केली. त्यानंतर थोडा वेळ या परिसरात फिरला अन् थेट नदीत उडी घेतली, अशा चर्चा घटनास्थळी होत्या. मात्र अक्षयने नदीत उडी घेतल्याचं कुणीच पाहिलं नव्हतं.

या संदर्भात लागलीचं दहीहंडा पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी हजर झाले आणि तात्काळ शोध बचाव पथकाला बोलवण्यात आले. शोध मोहीम सुरू झाली. अक्षयच्या शोधार्थ तब्बल १५ ते २० दिवस शोधमोहीम सुरू होती. अक्षय नदीत उडी घेतल्यानंतर नदीला दोन मोठे महापूर आले होते. तरीही मुक्ताईनगर येथील नद्यांच्या संगमापर्यंत ही शोध मोहीम राबवली. पण अक्षयचा शोध लागला नाही. त्यानंतर शोध मोहीम थांबवण्यात आली.

प्रेयसीचा धोका असल्याने अक्षयनं उचललं होतं पाऊल

अक्षयच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयचं एका तरुणीवर प्रेम होतं. ८ ऑगस्ट २०२२ च्या दीड वर्ष आधीपासून ‘तो’ एका तरुणीच्या प्रेमात होता, अनेकदा त्यांच्या दोघांमध्ये वाद व्हायचा, वादाचं कारणही तेवढंचं असायचं. ते म्हणजे प्रेयसीने लग्नासाठी ठेवलेल्या अनेक अटी. प्रेयसीने अक्षयला म्हटलं होतं की आई-वडिलांबरोबर राहायचं नाही, बहिणींसह आई-वडिलांना सोडून दे, कारण तुझ्या आई-वडिलांनी तुझ्यासाठी काही कमावलं नाही, हे सर्व करणार तेव्हाच लग्नाला होकार देणार. असा हट्ट तरुणीने अक्षयसमोर धरला होता. त्यावेळी अनेकदा पोलिसांत लेखी स्वरुपात तक्रारी दाखल झाल्या. एकमेकांना लिहून देऊन लग्नालाही होकार झाला. मात्र, अचानक त्यांचात नेमका काय नवीन वाद झाला, अन् परत असं काय झालं की अक्षय याला एवढे मोठे पाऊल उचलावे लागले, हे सध्या गुपित आहे.

पोलीस वडील दंगलीतून सुखरुप घरी परतातच हंबरडा फोडत मुलीने मारली मिठी

आमचा पोटचा जीव गेला

आज आमचा पोटचा जीव गेलाय, त्या तरुणीने अक्षयला कुठचं ठेवलं नाहीये. तिच्यामुळे तो अनेकदा तणावत राहत असायचा, तिचा फोन नाही आला की अक्षयला मोठं टेशन यायचं. त्याने तिला सोडून द्यायचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर ‘ती’ घरी यायची आणि अक्षयसोबत भांडण करून त्याला मारहाण करायची, अशा अनेक गोष्टींना ‘तो’ त्रस्त झाला होता. त्याचं टेंशन घेणे, रडणे वगैरे आम्हाला पण बघवत नव्हतं. अशा प्रतिक्रिया त्याच्या घरच्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, आमचा अक्षय अजूनही जिवंत आहे, त्याला काहीच झालं नसावं असा विश्वास त्याच्या कुटुंबियांना आहे. आज ७ महिने २५ दिवस उलटून गेले, अजूनही अक्षय बेपत्ता आहे, त्याचा सुगावा सुद्धा लागला नाही. जर अक्षय ‘तू’ भीतीपोटी कुठे असेल तर घरी ‘ये’ टेंशन घेऊ नको, आम्ही तुझ्यासोबत आहोत. असावं त्याच्या कुटुंबांयांनी केलं आहे.

एकच वेळ, ठिकाण वेगवेगळं, तरुण-तरुणीने आयुष्य संपवलं, दोघांचं नातं समोर आलं नि सारेच हळहळले

‘तो’ जिवंत आहे का? मग राहतो कुठे?

सद्यस्थितीत अक्षयच्या प्रकरणात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदणी आमच्या पोलिसांत दाखल आहे. सर्वच पोलीस स्टेशनला अक्षयचे मिसिंग कागदपत्र पाठवण्यात आले आहेत, तरीही आतापर्यंत त्याचा शोध लागला नसून पुढील तपास सुरू असल्याचं दहीहंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत म्हणतात. दरम्यान ‘अक्षय’ अजूनही जिवंत आहेय का? मग ‘तो’ राहतो कुठे? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलीस शोधणार काय हे सुद्धा पहावे लागणार.

हे बाळ माझ्या मुलाचं नाही, सासूचे शब्द ऐकून सुनेने जीवन संपवलं; सासरच्यांनी चिमुकलीला नेलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed