• Mon. Nov 25th, 2024
    वेदोक्त मंत्र म्हणण्यास नकार; संयोगिताराजे छत्रपतींनी काळाराम मंदिरातील महंतांना सुनावलं

    नाशिक: देशभरात काल रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली, यावेळी महंतांनी ही पूजा पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली.शाहू महाराज यांच्याविषयी वेदोक्त प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यावेळी महाराजांनी धार्मिक क्रिया पुराणोक्त विधिनुसार न करता वैदिक विधिनुसार करण्याचा आदेश काढला. त्यावेळी अनेक रोषांना सामोरे जावे लागले होते. आता शाहू महाजांच्या वंशज संयोगीताराजे छत्रपती यांच्या एका सोशल मीडिया पोस्टवरून हा वाद पुन्हा निर्माण झाला आहे. देशभरात काल रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली, यावेळी महंतांनी ही पूजा पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले.

    युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतींचे शनिचौथऱ्यावर पूजन, संभाजीराजेंच्या अर्धांगिनीचे धाडस

    हा सगळा प्रकार संयोगिता राजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच… तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणाली, असे संयोगिताराजे छत्रपती यांनी पोस्टमध्ये सांगितले आहे.

    माझ्या जीवनाशी एकरुप झालात, प्रत्येक चढउतारामध्ये खंबीरपणे साथ दिलीत; संभाजीराजेंची पत्नीसाठी भावनिक पोस्ट

    शाहू महाराज वेदोक्त प्रकरण काय?

    धार्मिक क्रिया पुराणोक्त विधीनुसार न करता त्या फक्त वैदिक विधीनुसारच करण्यात याव्यात असा आदेश शाहू महाराज यांनी काढला होता. यास नारायणराव राजोपाध्ये यांनी फेटाळले. त्यावर शाहू महाराजांनी नारायणराव राजोपाध्ये यांना कुलपुरोहित या पदावरून काढून टाकत जमिनी सरकार जमा करण्यात आल्या. हा वाद वाढत जाऊन थेट ब्रिटिश सरकारकडे गेला. मात्र ब्रिटिश सरकारने राजोपाध्ये यांना सुनावले. मात्र त्यानंतरही वाद चिघळत राहिला. शेवटी करवीर धर्मपीठाचा वेदोक्त प्रकरणी निर्णय झाला. यात ते म्हणतात की, छत्रपती शाहू महाराज यांचे घराणे क्षत्रिय असून वेदोक्त कर्म करण्यास काही हरकत नसल्याचे म्हटले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed