• Mon. Nov 25th, 2024
    शेतकऱ्यांना दरीत काहीतरी दिसलं, जवळ जाऊन पाहिलं तर हादरवणारं दृश्य, पोलीस म्हणतात हा तर…

    हिंगोली: हिंगोली जिल्ह्यामधल्या वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीतील सिंदगी येथील २६ वर्षीय युवक एक महिन्यापासून बेपत्ता होता. अखेर ३० मार्च रोजी पहाटेच्या सुमारास त्याचा मृतदेह सुकळी शिवार जंगलातील एकादरीमध्ये आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीतील सुकळी शिवारामध्ये काही शेतकरी जनावरे चारण्यासाठी गेले असता ३० मार्च रोजी त्यांना एका दरीमध्ये मृतदेह दिसून आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यानंतर सांगाडा दिसून आला. त्यानंतर त्याबाबतची माहिती कुरुंदा पोलिसांना दिल्यानंतर तात्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

    आत्याच्या मुलाशी लग्न, वारंवार शरीरसंबंध, अल्पवयीन मुलगी गरोदर अन् सारं सत्य उघड
    घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांच्यासह तुकाराम आमले, बापूराव बाभळे, विलास राठोड,यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या साहाय्यानेने हा सांगाडा दरीमधून बाहेर काढला. याच सांगाड्या जवळ मोबाईलसह काही वस्तू आढळून आल्यानंतर सदर मृतदेह कृष्णा माधवराव तोरकड (वय २६ वर्ष) राहणार सिंदगी तालुका कळमनुरी येथील असल्याचे स्पष्ट झाले.

    महिला-पुरुषांसाठी एकच बाथरुम; भाड्याच्या घरात असलेलं पोलीस ठाणे अडचणीत, कर्मचारी हतबल

    दरम्यान, कृष्णा तोरकड हा गेल्या दोन मार्चपासून बेपत्ता होता. त्याच्या नातेवाईकांनी अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला मात्र तो कुठेही मिळून आला नाही. त्यानंतर त्यांनी २६ मार्च रोजी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. त्यावरून पोलिसांनी त्याची नोंद घेतली होती. सदर सांगाडा पोलिसांनी कुरुंदा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविल्यानंतर त्यांच्यावर शवविच्छेदन केले. अद्याप ही घटना मृत्यू की घातपात याचा अहवाल कळू शकला नाही.

    सूरतकडे निघाले, वाटेत कुटुंबीयांशी संवाद, मग प्रेमीयुगुल रस्त्यावर पडलेले आढळले, अन्…
    सांगड्याजवळ मिळालेल्या मोबाईलची कॉल डिटेल काढल्यानंतर या प्रकरणाचा काहीसा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. परंतु सदरील घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *