कामासाठी मुदखेडहून नांदेडला ऑटोने येत असलेल्या मजुरांवर काळाने घाला घातला आहे. ट्रकच्या धडकेने ऑटो मधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत आठ ते दहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू पावणाऱ्यामध्ये एका सात महिन्याच्या बालिकेचा समावेश आहे. जखमींना नांदेडडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास मुदखेड तालुक्यातील मुगट शिवारा जवळीळ इसार पेट्रोल पंपाजवळ हा भीषण अपघात घडला.
मुदखेड शहरातून दहा ते बारा जण कामासाठी ऑटोने नांदेडला येत होते. मुगट शिवारा जवळील एस्सार पेट्रोल पंपा जवळ येताच समोरून सिमेंटने भरलेल्या ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. अपघातात एवढा गंभीर होता की ट्रकच्या धडकेनंतर ऑटो पलटी झाला आहे.
ऑटो मधील सरोजा रमेश भोई ( वय ४0, रा मेहकर. जिल्हा बुलढाणा), गाली कल्याण भोई ( वय २४ रा.गेवराई जिल्हा बीड), जोयल कल्याण भोई ( वय ७ महिने), पुंडलिक बळीराम कोल्हटकर ( वय ७0 रा. सावरगाव माळ , भोकर , नांदेड) आदींचा जागीच मृत्यू झाला. तर विद्या हाटकर ( वय ३७ रा. इजळी ता. मुदखेड) या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. इतर सात ते आठ जण जखमी झाले आहे. सर्व जखमीना स्थानिक नागरिकांच्या मदतीने विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुदखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर या मार्गांवरील मुदखेड नांदेड मार्गांवर वाहतूक ठप्प झाली होती.विशेष म्हणजे काही महिन्या पूर्वी ही याच मार्गवर भीषण अपघात झाला होता.
सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?
