• Mon. Nov 25th, 2024
    बॉडीगार्डची आत्महत्या की हत्या याचा तपास पोलीस करतील, त्यात राजकारण नको : रोहित पवार

    बारामती : एखाद्या नेत्याचा माजी बॉडीगार्ड जेव्हा आत्महत्या करतो, त्यावर लक्ष केंद्रीत करून शेतकरी आणि युवा वर्गाच्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष करायचे प्रयत्न असेल तर तसे होणार नाही. हत्या की आत्महत्या हे पोलीस ठरवतील, त्यावर राजकारण करू नये, असा टोला भाजप नेते मोहित कंबोज यांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. मोहित कंबोज यांनी जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक वैभव कदमांनी केलेल्या आत्महत्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. बारामती येथे एका कार्यक्रमानिमित्त रोहित पवार आले होते, त्यानंतर त्यांनी मध्यंशी संवाद साधला. यावेळी अनेक प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले.

    यावेळी पवार म्हणाले की, मंत्रायलात लोक जातात त्याचे कारण खालच्या लेव्हलला काम होत नसे तेव्हा मंत्रालयात जातात. मंत्रालयात जाऊन काम होत नाही हे समजल्यावर आत्महत्या करणे ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले ही चिंतेची बाब आहे. सरकार काही करत नसेल तर लोकं उघड्या डोळ्याने बघत असतात. माणूस आत्महत्येचा निर्णय त्याच वेळेस घेतो ज्यावेळेस हातात काही गोष्टी नसतात. सरकार त्याला एक पर्याय असू शकतं परंतु जर सरकार राजकारणात मग्न असेल तर सर्वसामान्य लोकांकडे कोण बघणार? हे प्रमाण असंच वाढत राहिलं तर महाराष्ट्रालाही शोभणार नाही. नसल्याचे त्यांनी सांगितले.

    गिरीश बापट मोठे नेते होते. यांनी मंत्री असताना त्यांनी चांगले काम केलं. मोठा नेता आपल्यात नाही. आमच्या सारखे नवीन आमदार या नेत्यांकडून शिकण्याचा प्रयत्न करत असतात. पुढच्या पिढीचे मोठे नुकसान झाले आहे, अशी भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली.

    आत्महत्यांच्या घटनेचं राजकारण करु नये :रोहित पवार

    आत्महत्येसारख्या घटनांचा फक्त राजकिय हेतुतून तपास सीबीआय कडे जात असेल तर ते योग्य नाही. कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. पण हे करत असताना राजकारण करता काम नये. बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने महाराष्ट्रच्या पोलिसांची बदनामी केली. त्यांना वाटले की सुशांत सिंग राजपूत याचं नाव पुढे करून बिहाराची निवडणूक सोपे होईल पण तसे झालं नाही, असं रोहित पवार म्हणाले.

    डिसले गुरुजी अमेरिकेला जाऊन आले पण अहवाल दिला नाही, विद्यार्थ्यांना फायदा कसा होणार? जिल्हा परिषदेपुढं प्रश्न

    राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला म्हणून यात्रा काढणार असे समजले. यात्रा काढण्यात त्यांचा अधिकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्यावर खालच्या पातळीत बोललं गेलं. त्यावेळेस यात्रा का काढले नाही? तेव्हा काय निषेध केला नाही. राजकीय हेतूनं तुम्हाला सगळ्या आहेत गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला संस्कृती कळत नाही ती कधीच तुमच्याकडून जपली जाणार नाही, असा पलटवार रोहित पवार यांनी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेवर केला.

    आयपीएलपूर्वीच मुंबई इंडियन्समध्ये वादाची ठिणगी, रोहित शर्मा आणि प्रशिक्षकांमधील मतभेद उघड

    तानाजी सावंत एखादं स्टेटमेंट करतात ते आपण किती सिरियसली घ्यायचं हे ठरवलं पाहिजे. त्यांचा अभ्यास किती असतो हे दाखवून दिले आहे. त्यांनी सांगितले की १५० बैठका घेतल्या. त्यांची कॅपिसिटी आहे की नाही हे मला सांगता येणार नाही. जेव्हा पक्ष फुटत होता तेव्हा फडणवीस म्हणत होते, मला याबद्दल काही माहित नाही ज्यावेळेस अधिवेशन भरलं त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले या सगळ्या पाठीमागे एकच माणूस आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि आता तानाजी सावंत म्हणत आहेत की त्यांनी दीडशे घेतल्या. आता खरं कोण हे लोकांना कसं कळणार? गेल्या आठ नऊ महिन्यात आपल्याला अनेक नाट्यमय घटना बघावा लागल्या आणि लोकांचे हित बाजूला राहिले आहे, असं रोहित पवार म्हणाले.

    राज्यात सध्या राजकीय हेरा फेरी सारखा चित्रपट सुरु आहे. हे सगळे राजकीय कलाकार आहेत. स्वतःच्या स्वार्थापोटी, प्रसिद्धी साठी हा चित्रपट रंगवत आहेत, असं रोहित पवार म्हणाले.

    धंगेकर भेटायला गेले तर बापट म्हणाले, रवी काही अडचण आली तर सांग, मी बघतो…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *