मुंबई, दि. 29 : राज्यातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता व विणकारांनी उत्पादित केलेल्या उत्कृष्ट वाणाला सम्मान मिळावा, या दृष्टीकोनातून मुंबई विभागात ‘विभागीय हातमाग कापड स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे.
या स्पर्धेचे आयोजन दिनांक 31 मार्च 2023 रोजी दुपारी 1.00 वाजता वस्त्रौद्योग मुंबई, भोरुका चॅरीटेबल ट्रस्ट, ट्रान्सपोर्ट हाऊस, 5 वा मजला, 128-ब पुना स्ट्रीट, मस्जीद (पूर्व) 400009 येथे करण्यात आले आहे.
हातमाग कापडाचे नमुने वरील कार्यालयात दि. 31 मार्च 2023 रोजी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत दाखल करुन नमुन्यावर त्यांचे नाव, पत्ता वापरण्यात आलेल्या धाग्याचा प्रकार डिझाईन, रंग व कापडाची विशेषत: अशाप्रकार कापडाचे वितरण किंमतीसह देणे आवश्यक आहे. वेळेनंतर आलेले नमुने स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी वरील पत्त्यावर तसेच ईमेल[email protected], दूरध्वनी क्र.022-23700611 येथे संपर्क साधता येईल.
स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विणकरांनी कमीत कमी 1 नग व मिटरमध्ये कमीत कमी 2 मिटर कापड स्पर्धेकरीता पाठवावे. विभागीय हातमाग कापड स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस पात्र नमुन्याकरिता अनक्रमे 25 हजार, 20 हजार व 15 हजार रुपये बक्षीस देण्यात येईल, हातमाग विणकरांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन, प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रौद्योग, मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
००००