• Mon. Nov 25th, 2024
    सासऱ्यांमुळं सुनेवर सरपंचपद गमवण्याची वेळ, इतर सदस्यही अपात्र, जळगावात नेमकं काय घडलं?

    Jalgaon News Marathi: सासऱ्यांमुळं सुनेवर सरपंचपद गमावण्याची वेळ आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. त्याचबरोबर अन्य सदस्यही अपात्र ठरवले आहेत.

     

    म. टा. प्रतिनिधी, जळगावः सासऱ्यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याने त्याचा फटका महिला लोकनियुक्त सरपंचासह एका ग्रामपंचायत सदस्याला बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील म्हसवे येथील लोकनियुक्त सरपंच ज्योती संदानशिव व ग्रामपंचायत सदस्य उषा सैंदाणे यांच्या सासऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले आहे.म्हसवे येथील लोकनियुक्त सरपंच ज्योती सतीश संदानशिव यांचे सासरे भागवत उदा संदानशिव यांनी शासकीय जमिनीवर १९८ चौरस फूट अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले. तर ग्राम पंचायत सदस्य उषा दीपक सैंदाणे यांचे सासरे मगन खंडू सैंदाणे यांनी १६१ चौरस फूट अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी माधुरी खंडू पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारींवर सुनावणी सुरू ठेवली होती.

    ग्रामसेवक, गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी प्रत्यक्ष अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. तक्रारीत तथ्य असल्याचे सिद्ध झाल्याने त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ज्योती संदानशिव यांना लोकनियुक्त सरपंच म्हणून तर उषा सैंदाणे यांना सदस्य म्हणून अपात्र ठरविले आहे.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed