• Sat. Sep 21st, 2024
स्पीड ब्रेकरने बळी घेतला, एसटी चालकाचा अचानक ब्रेक, पाठीमागून धडकून बाईकस्वाराचा अंत

Satara Accident : वेंगुर्ला-स्वारगेट बस (एमएच २० बीएल ४०८०) च्या चालकाने महामार्गावर गतिरोधक दिसताच ब्रेक लावला. यावेळी वैभव सोनके यांची दुचाकी बसला पाठीमागून जोरात धडकली

 

Satara Karad ST Bus Bike Accident 900
सातारा अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू
सातारा : कराड शहरातील रस्त्यावरील गतिरोधकामुळे एसटी चालकाने अचानक ब्रेक लावला. यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो पाठीमागून एसटी बसला धडकला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एकाचा मंगळवारी उपचारदरम्यान मृत्यू झाला. वैभव विलास सोनके (वय ३२ वर्ष, रा. अहिल्यानगर, मलकापूर, ता. कराड) असे मृत युवकाचे नाव आहे.अपघातस्थळी व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव सोनके हे दुचाकी (एमएच ५० ई २६१४) वरून कामानिमित्त पाचवड फाट्याकडे गेले होते. काम आटोपून घरी मलकापूरला परत येत असताना शिवार हॉटेलसमोर आले असता, वेंगुर्ला-स्वारगेट बस (एमएच २० बीएल ४०८०) च्या चालकाने महामार्गावर गतिरोधक दिसताच ब्रेक लावला. यावेळी वैभव सोनके यांची दुचाकी बसला पाठीमागून जोरात धडकली. यात सोनके यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते बेशुद्ध झाले होते.

निर्जनस्थळी प्रियकराशी शरीरसंबंध, अतिरक्तस्रावाने प्रेयसीचा मृत्यू; १८ वर्षीय तरुण अटकेत
यावेळी नागरिकांनी सोनके यांना तातडीने उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केले होते. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्यातील हवालदार प्रशांत जाधव यांच्यासह कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. अपघातस्थळाचा पंचनामा केला व दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मात्र, उपचार सुरू असताना पहाटे त्यांचा मृत्यू झाला. सोनके यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

२०२० साली सेवानिवृत्त, तरी नागरिकांसाठी नांदेडच्या वाहतूक पोलिसाची दररोज विनाशुल्क सेवा

पुणे-बंगळूरू महामार्गावर शिवार हॉटेलसमोर सोमवारी हा अपघात झाला होता. या अपघाताची कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. महामार्गावरील गतिरोधकामुळे अपघात होऊन एकाचा बळी गेल्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
दिव्यांग प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न, अल्पवयीन गर्दुल्ला ताब्यात, धक्कादायक कारण समोर

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed