• Mon. Nov 25th, 2024
    बाळासाहेब-वाजपेयींना जमलं नाही, मी सात लाखांची गर्दी जमवली, तानाजी सावंतांची आत्मस्तुती

    पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेटमधील आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या एका धाडसी वक्तव्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तानाजी सावंत यांनी आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यापेक्षाही वरचढ असल्याचं एकप्रकारे सांगितल्याचं बोललं जात आहे. “ज्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी यांना सुद्धा गर्दी जमवता आली नाही, तिथे सावंत बंधूंनी सात लाखांची गर्दी जमवून दाखवली.” असा धाडसी दावा तानाजी सावंत यांनी केला. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे एका कार्यक्रमात सावंत यांनी आत्मस्तुती केली.तानाजी सावंत स्वतःची पाठ थोपटण्याच्या ओघात बरंच काही बोलून गेले. परंतु थेट बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या विद्यमान सरकारसह देशाच्या राजकारणातील दिग्गजांसाठीही पितृतुल्य असलेल्या व्यक्तिमत्त्वांशी तानाजी सावंत यांनी स्वतःची तुलना केल्याची चर्चा आहे. त्यामुळे डॉ. तानाजी सावंत एकनाथ शिंदेंची शिवसेना, ठाकरे गट आणि भाजप या तिन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांचा रोष ओढवून घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले?

    “या आपल्या सोलापूर जिल्ह्यातील किंवा तमाम महाराष्ट्रातील जनतेला माहित होतं, जे पटांगण आपण घेतलं होतं सभेसाठी, ते स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनाही भरलं नाही, आमचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्याही सभा झाल्या, त्यांनाही भरलं नव्हतं, अडवाणीजी यांनाही भरलं नव्हतं, आणि ती किमया या पंढरीच्या नगरीमध्ये सावंत बंधूंनी २०१७-१८ च्या दरम्यान सात लाख लोकांचा मेळावा भरवून करुन दाखवली” असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी पंढरपुरात आयोजित एका कार्यक्रमात केलं आहे.

    पवारांचा हस्तक्षेप अन् काँग्रेसचे नमते; सावरकरांविषयी टीका न करण्याची राहुल गांधी यांची हमी

    सलग दुसऱ्या दिवशी चर्चेत

    “२०१९ मध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने राज्यात मी पहिल्यांदा बंडखोरी केली, असा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केल्याचं कालच समोर आलं होतं. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी स्वतः मिळून १५० बैठका घेतल्या नि आमदारांचं मन वळवलं, असा दावाही तानाजी सावंत यांनी यावेळी केला होता.

    फडणवीसांच्या आदेशाने बंडखोरी करणारा पहिला मी होतो; तानाजी सावंतांच्या गौप्यस्फोटामुळे मोठी खळबळ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *