• Mon. Nov 25th, 2024
    आता मुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदे म्हणायचं… नवी मुंबईतील कार्यक्रमात डी. लीट पदवी प्रदान

    नवी मुंबई : डी वाय पाटील विद्यापीठाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी.लीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आज डी वाय पाटील स्टेडियममध्ये पार पडलेल्या दीक्षांत समारोहात त्यांना डी.लीट ही पदवी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल त्यांना ही मानद डी.लीट पदवी प्रदान करण्यात येत असल्याचे डीवाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

    सामाजिक क्षेत्रात खास करून कोरोना काळात रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी, त्याना रेमडेसीवीर आणि इतर औषधे मिळावीत यासाठी शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले तसेच लोकांमध्ये मिसळून त्यांनी अनेकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय वैद्यकीय सोयी सुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता आणि बेडस रुग्णवाहिका वेळेत मिळाव्यात यासाठी देखील त्यांनी विशेष प्रयत्न केले.

    तर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केरळ येथील महापूर असो, महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकल्यावर केलेले मदतकार्य असो किंवा कोल्हापूर महाड येथे आलेल्या महापूरावेळी केलेले मदतकार्य असो आशा अनेक नैसर्गिक आपत्तीच्या वेळी धावून जात त्यांनी केलेल्या मदतीमुळे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed