• Sat. Sep 21st, 2024
सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आणखी झळ, पेनकिलरसह अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार

मुंबईः सर्वसामान्य नागरिकांना सतत महागाईचा फटका बसत आहे. सातत्याने महागाई वाढत असून अत्यावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. त्यातच आता औषधांच्या किंमतीतही वाढ होण्याची दाट शक्यता आहे. पेनकिलर, अँटी- इन्फेक्टीव्ह, कार्डिअॅक ड्रग्ज आणि अँटीबायोटिक्ससह अत्यावश्यक औषधांच्या किंमती एप्रिलपासून वाढणार आहेत. औषध कंपन्यांना किंमती वाढवण्याची परवानगी केंद्र सरकार देणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी ऑफ इंडियानुसार (NPPA) 2022पर्यत सरकारने अधिसूचित केलेल्या (WPI) मधील वार्षिक बदलाच्या आधारे १२ टक्क्यांपर्यंत किंमती वाढवल्या जाऊ शकतात. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर औषध कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेरील प्रवास महागला, चालकांना आता मोजावे लागणार इतके पैसे, वाचा सविस्तर
एका अहवालानुसार, औषधांची किंमत १२ टक्क्यांहून अधिक वाढू शकते. औषधांची किंमत वाढण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. शेड्युल औषधांच्या किमती सुमारे १० टक्क्यांनी वाढू शकतात. शेड्युल ड्रग्स म्हणजे अशी औषधे ज्यांच्या किंमतींवर सरकारी नियंत्रण असते. नियमांनुसार, शेड्युल औषधांच्या किंमती सरकारच्या परवानगीशिवाय वाढवता येऊ शकत नाही. सूत्रांनुसार, एनपीपीए पुढच्या काही दिवसांत किंमत निर्धारित फॉर्म्युलेशनच्या किमती सूचित करेल.

नामिबियातून आणलेल्या मादी चित्त्याचा कुनोमध्ये मृत्यू, साशाला झाला होता गंभीर आजार
औषधांच्या किमती वाढल्याने या उद्योगाशी संबंधित लोकांना दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून, औषधी वस्तू, मालवाहतूक आणि प्लास्टिक आणि पॅकेजिंग वस्तूंसह कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाली होती. परिणामी त्यामुळं औषधांच्या किंमती वाढणार आहेत. किंमती वाढल्याने या उद्योग जगताशी संबंधित लोकांना दिलासा मिळणार आहे.
घर घेण्याचं स्वप्न पाहताय?; दोन वर्षांत घरांच्या किंमतीत २० लाखांनी वाढ, ही कारणं महत्त्वाची

Urinary Infection Causes | युरिनरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed