• Sat. Sep 21st, 2024

इंदुरीकर महाराजांचा गौतमी पाटीलवर निशाणा; म्हणाले तिने ३ गाण्यांचे ३ लाख घेतले आणि आम्ही…

इंदुरीकर महाराजांचा गौतमी पाटीलवर निशाणा; म्हणाले तिने ३ गाण्यांचे ३ लाख घेतले आणि आम्ही…

बीड: आपल्या वक्तव्यांनी सतत चर्चेत राहणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. तिने ३ गाणी वाजवून तीन लाख रुपये घेतले आणि आम्ही ५ हजार रुपये जास्त मागितले, तर लोक म्हणतात काय खरंय याचं, असे इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. ते बीडमध्ये आयोजित कीर्तनात बोलत होते. बीडमधील आष्टी तालुक्यातील तवलवाडी या गावात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना आपल्या शैलीत त्यांनी गौतमी पाटील हिचे नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला आहे.

पत्नीपीडित पुरुषांचं पुण्यात आंदोलन, एलन मस्क यांना मानले आदर्श, सरकारकडे केली मोठी मागणी
गौतमी पाटीलवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, ‘तिने (गौतमी पाटीलने) ३ गाणी वाजवली आणि ३ लाख रुपये घेतले. तिच्या कार्यक्रमात मारामारी झाली, काहींचे गुडघेही फुटले, पण तिच्याविषयी काही बोललं जात नाही आणि आम्ही ५ हजार जास्त मागितले तर लोक म्हणतात की काय खरंय त्याचं, सगळी जनता लुटली से म्हणतात.’

पुण्यात रानडुकराची भाविकांच्या रिक्षाला जोरात धडक; एका भाविकाचा जागेवरच मृत्यू, तिघे जखमी
ज्या भागात इंदुरीकर महाराज कीर्तन करत होते, त्याच परिसरात काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमामध्येही प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. लोकांची धावपळ उडाली होती. या घटनेत काही लोक जखमी देखील झाले होते. गौतमी पाटील हिच्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य करताना इंदुरीकर महाराजांनी या घटनेचा संदर्भ दिला.
खेळताना चेंडू खड्ड्यात पडला, १२ वर्षांचा मुलगा तो काढायला गेला आणि मोठा अनर्थ घडला, परिसरात हळहळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed