• Mon. Nov 25th, 2024

    लहान बहीण घरी आली, दरवाजा ठोठावला, आतून कुणीही दरवाजा उघडेना; उघडताच पायाखालची जमीन सरकली

    लहान बहीण घरी आली, दरवाजा ठोठावला, आतून कुणीही दरवाजा उघडेना; उघडताच पायाखालची जमीन सरकली

    जळगाव : आई धुणीभांडी करण्याच्या कामासाठी, तर लहान बहीण शिकवणीसाठी घराबाहेर पडल्यानंतर घरात एकट्या असलेल्या मोठ्या मुलीने गळफास घेवून मृत्यूला कवटाळल्याची घटना शनिवारी सकाळी जळगाव शहरातील पिंप्राळा येथे उघडकीस आली आहे. प्रीती मंगेश जाधव (वय २०, रा. दिक्षा भूमी नगर, पिंप्राळा-हुडको) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    पिंप्राळा-हुडको भागातील दिक्षाभूमी नगर येथे प्रीती ही आई व लहान बहिणीसह वास्तव्यास होती. शनिवारी सकाळी प्रीतीची आई नेहमीप्रमाणे धुणी-भांडी करण्याच्या कामासाठी तर लहाण बहीण ही शिकवणीसाठी घराबाहेर पडली. त्यामुळे प्रीती ही घरात एकटी होती. यादरम्यान घरात एकट्या असलेल्या प्रितीने घरामध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.

    भाजपच्या बॅनरवर मनसे आमदाराचा फोटो; चर्चेला उधाण, लोक म्हणतायत हे भाजप-मनसे युतीचे संकेत
    ११ वाजण्याच्या सुमारास लहान बहीण ही शिकवणी सुटल्यावर घरी आली. तिने दरवाजा ठोठावला. पण, आतून कुणाकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याने तिने शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर लहान बहिणीच्या पाया खालची जमीनच सरकली. तिला मोठी बहीण प्रीती हिचा ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला.

    त्यानंतर तिने हंबरडा फोडला. काही वेळानंतर आईने घर गाठल्यावर मुलीचा मृतदेह पाहून तिनेही आक्रोश केला. ही घटना कळाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. सर्व काही सुरळीत असतांना प्रीतीने केलेली आत्महत्या ही सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आहे.

    हसन मुश्रीफ यांना सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स, कागलमध्ये तणावपूर्ण वातावरण
    दरम्यान, प्रीतीच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख व विनोद सुर्यवंशी करीत आहेत. मयत प्रीती हिच्या पश्चात आई, दोन बहिण व भाऊ असा परिवार आहे. एक बहिण विवाहित असून भाऊ विवाहित बहिणीसोबत राहायला आहे. या घटनेने पिंप्राळा परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे.

    ज्येष्ट नाट्य समीक्षक, लेखक, दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed