या भीषण अपघातातील मृतांमध्ये २ मुले आणि ३ महिलांचा समावेश आहे. तर ७ गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला होता. बघ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात जमली होती.