• Thu. Nov 14th, 2024

    पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या निधनाबद्दल राज्यपाल रमेश बैस यांना दुःख

    ByMH LIVE NEWS

    Feb 22, 2023
    पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या निधनाबद्दल राज्यपाल रमेश बैस यांना दुःख

    मुंबई, दि. 22 : राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना, विदुषी पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

    “पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांनी आपले संपूर्ण जीवन भारतीय शास्त्रीय नृत्याच्या प्रचार, प्रसार व संशोधनासाठी समर्पित केले. मोहिनीअट्टम तसेच कथकली नृत्य प्रकारात त्या विशेष पारंगत होत्या. ‘नालंदा नृत्य आणि संशोधन केंद्र’ आणि ‘नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक उत्तमोत्तम शिष्य घडवले, नृत्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवले तसेच मूलभूत संशोधन केले. त्यांच्या निधनामुळे शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील एका महान नृत्य तपस्विनीला गमावले आहे, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

    000

    Governor Ramesh Bais condoles demise of Dr Kanak Rele

    Mumbai : Governor Ramesh Bais has expressed condolences on the demise of veteran dance guru and Mohiniyattam exponent Dr. Kanak Rele in Mumbai. In a condolence message, Governor Bais has said: “Padma Bhushan Dr. Kanak Rele dedicated her entire life to the cause of promotion, propagation and research of Indian classical dance forms. She was one of the finest exponents of Mohiniyattam and Kathakali.  Dr. Rele made fundamental work in the field of dance through her Nalanda Dance Research Centre and the Nalanda Nritya Kala Mahavidyalaya. She trained hundreds of students and brought classical dance close to the people. In her demise we have lost a great Nritya Tapaswini”.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed