• Thu. Nov 14th, 2024
    राज्यात ३ दिवस शाळा बंद राहणार? शासनाचा मोठा प्रस्ताव; मुख्याध्यापकांच्या हातात असणार निर्णय

    School 3 Days Holiday Vidhan Sabha Nivadnuk : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. यावर उत्तर देत शासनाने याबाबतच्या निर्णयाचे अधिकार मुख्यध्यापकांना दिले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने राज्यात १८ ते २० नोव्हेंबर असे सलग तीन दिवस राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येण्याविषयीचा प्रस्ताव देण्यात आला होता. शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. आता या प्रस्तावावर शासनाने उत्तर दिलं आहे.

    या प्रस्तावानुसार, राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सुरळीतपणे पार पडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणं शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय आपल्या स्तरावरुन घ्या. तसंच आवश्यक त्या सूचना द्याव्यात, असं सांगण्यात आलं आहे.

    शाळांना सुट्टी द्यावी की नाही? मुख्यध्यापकांकडे निर्णयाचे अधिकार

    शिक्षण आयुक्त कार्यालयाने शाळांना सुट्टीचा प्रस्ताव दिला होता. त्याला सरकारने मान्यता देत, शाळांना सुट्टी द्यावी की नाही हे अधिकार मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक आपल्यानुसार आपल्या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेऊ शकतात, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed