• Tue. Nov 26th, 2024

    जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ByMH LIVE NEWS

    Feb 16, 2023
    जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    जळगावदि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : – जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाहीअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोकरता. जळगाव येथील कार्यक्रमात सांगितले.

    जळगाव जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पातील भोकर येथे तापी नदीवरील 150 कोटी रुपयांच्या उंच पुलाचे भूमिपूजन कोनशिला अनावरण करुन व जिल्ह्यातील 270 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलग्रामविकास मंत्री गिरीश महाजनबंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसेउद्योगमंत्री उदय सामंतखासदार रक्षा खडसेखासदार उन्मेष पाटीलआमदार सर्वश्री. संजय सावकारेकिशोर पाटीलसुरेश भोळेमंगेश चव्हाणचंद्रकांत पाटीललता सोनवणेमाजी आमदार स्म‍िता वाघचंद्रकांत सोनवणेजिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

    मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले कीसर्वसामान्य नागरिकशेतकरी- कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून राज्य शासन काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या काही योजनाप्रकल्प आवश्यक आहेत. त्यांना तत्काळ मंजुरी देण्यात येत आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर खेत पाणीहर घर जल या योजनांवर राज्य शासन प्रामुख्याने लक्ष देत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध व्हावेयाकरिता राज्य शासनाने राज्यातील 22 जलसिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे राज्यातील 5 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल उपसा सिंचन योजनेला 100 कोटी व निम्न तापी प्रकल्पाला 100 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर निम्न तापी प्रकल्पाचा तापी नदीवरील या पुलामुळे 70 किमी वळसा वाचणार आहेत. त्यामुळे हा पूल सर्वांसाठी वरदान ठरणारा आहे. हर घर नलजलजीवन मिशन अंतर्गत राज्यात 38 हजार गावात कामे सुरु आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळावी याकरिता अमरावतीच्या धर्तीवर जळगावधुळेनंदूरबार जिल्ह्यासाठी एमआयडीसीचे विभागीय कार्यालय जळगाव येथे सुरु करण्यासाठी बैठक घेण्यात येईल. तसेच मुक्ताईनगरधरणगावचोपडापाचोराएरंडोल येथे एमआयडीसी सुरु करण्यात येईल. जळगाव  जिल्ह्यात वारकरी भवन व लोककला भवन उभारण्यासाठी सकारात्मक विचार करु शिवाय जिल्ह्यातील वाहतुकीसाठी 100 बसेसपाळधी येथे बालकवी ठोंबरे स्मारकबहिणाबाई चौधरी स्मारकधरणगाव येथे उपजिल्हा रुग्णालय व नशीराबाद येथे ग्रामीण रुग्णालय मंजुरीबाबत आणि केळीचा पोषण आहारात समावेश करण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईलअसेही ते म्हणाले.

    यावेळी बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कीजळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांसह दोन राज्यांना जोडणाऱ्या या पुलाचे स्वप्न आज पूर्ण होत आहे याचा विशेष आनंद आहे. जलजीवन मिशन अतंर्गत राज्यातील 38 हजार गावांमध्ये कामे सुरु असून या कामांच्या माध्यमातून  नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यात येत आहे. केळीचा पोषण आहारात समावेश करावा. केळी प्रक्रिया उद्योग सुरु करावा. टोकरेकोळी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावेकापसाला हमी भाव देण्याची मागणीही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.

    ग्रामविकास मंत्री श्री. महाजन म्हणाले कीमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. जळगावात मेडिकल हबचे काम सुरु होत आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

    कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी पाडळसे प्रकल्पाचा बळीराजा योजनेत समावेश करुन काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली.

    या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण

    भोकरता. जि. जळगाव येथे तापी नदीवरील उंच पुल व जोड रस्त्याचे भूमिपूजन (रु. 150 कोटी)

    *  शिवाजी नगर येथील कि.मी. 420/9/11 वरील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण- रु. 25 कोटी.

    * मोहाडी (जळगाव) येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम करणे- रु.75 कोटी 31 लाख.

    म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन रु. 35 कोटी.

    जळगाव म.न.पा. हद्दीतील व वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन – रु. 42 कोटी.

    *  बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठया पुलाचे बांधकाम-रु. 40 कोटी.

    *  धरणगाव तालुक्यात विविध ठिकाणी रस्ते डांबरीकरण व पुलाचे बांधकाम-रु. 57 कोटी.

    * जळगाव व धरणगांव तालुक्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास कामे- रु. 25 कोटी.

    *  जळगाव येथे धर्मादाय आयुक्त कार्यालय इमारत बांधकाम-रु. 4 कोटी.

    *  धरणगाव येथे पशुसंवर्धन दवाखाना इमारत बांधकाम-रु. 4 कोटी.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed