• Mon. Nov 25th, 2024

    कामगार मंडळाकडील क्रीडा सुविधांचा कामगार खेळाडूंनी लाभ घ्यावा – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

    ByMH LIVE NEWS

    Jan 24, 2023
    कामगार मंडळाकडील क्रीडा सुविधांचा कामगार खेळाडूंनी लाभ घ्यावा – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली दि. 24 (जि.मा.का.) : कामगार खेळाडूंना अधिक चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यास कामगार मंडळ प्राधान्य देत आहे. कामगार मंडळाच्या क्रीडा सुविधांचा लाभ कामगार खेळाडूंनी घ्यावाअसे आवाहन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

    महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय कामगार कब्बडी स्पर्धा मुंबई तेथे होत आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास सांगली येथून कामगार मंत्री डॉ. खाडे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली. निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुलेजिल्हा सूचना अधिकारी यासीन सय्यद यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    कबड्डी स्पर्धा उद्घाटन सोहळा समारंभासाठी मुंबई येथे आमदार कालिदास कोळंबकरकामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिती वेद-सिंगलअपर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगलकामगार आयुक्त सुरेश जाधवकॅनरा बँकेचे  मुख्य महाप्रबंधक पी. संतोष यांच्यासह मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे मान्यवर पदाधिकारी कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित होते.

    राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना प्रथमतः शुभेच्छा दिल्या. कामगार मंत्री डॉ. खाडे म्हणालेकामगारांचे जीवनमान उंचावावे त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी शिवणवर्गशिशु मंदिर,  ग्रंथालय अभ्यासिकाव्यायामशाळाटेबल टेनिस कोर्टबॅडमिंटन कोर्टजलतरण तलाव अशा सुविधा पुरविण्यात येतात. याबरोबरच कामगार नाट्य स्पर्धालोकनृत्य स्पर्धा, भजन स्पर्धासमर्गीत व स्फूर्ती गीत स्पर्धासाहित्य संमेलन ही आयोजित केली जातात. या सर्व स्पर्धा व उपक्रमामुळे कामगारांच्या मध्ये आत्मविश्वास वाढतो. त्यांना नवीन ओळख मिळतेअसे डॉ. खाडे म्हणाले.

    कामगार खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मंडळ नेहमीच पुढाकार घेते. कामगार मंडळामार्फत जुलै 2021 मध्ये महाकल्याण क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रबोधिनीतर्फे मागील वर्षी दोन वेळा अंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धा आणि दोन वेळा राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १ हजार १५६ खेळाडूंनी सहभाग घेतला.  पाँडेचेरी येथे  झालेल्या नॅशनल रँकिंग चॅम्पियनशिप-2021 स्पर्धेत महाकल्याण क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी टेबल टेनिस खेळात  सुवर्ण आणि कास्य पदके मिळवली आहेत ही अभिमानाची बाब आहे. तसेच इंदोर व चितोडगड येथे आयोजित स्पर्धेत ही स्पर्धकांनी सुवर्ण रौप्य आणि कास्य पदकांची कमाई केली असल्याचे कामगार मंत्री डॉ. खाडे यावेळी म्हणाले.

    या राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेत 110 संघांनी  सहभाग घेतला असून यामधे 60 संघ महिलांचे आहेत. स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे,  ही अभिमानाची बाब असल्याचे कामगार मंत्री डॉ. खाडे म्हणाले.

    आमदार कोळंबकर यांनी स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच आपणास या स्पर्धेच्या शुभारंभ कार्यक्रमास आमंत्रित केल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद दिले.

    खेळाडूंनी उचित ध्येय गाठण्यासाठी जिद्द सोडू नयेखेळत रहाकौशल्य दाखवा, असे आवाहन कॅनरा बँकेचे मुख्य महाप्रबंधक पी. संतोष यांनी केले. कामगार विभागाने चांगल्या स्पर्धा आयोजित केल्या असल्याबद्दल कामगार विभागाचे त्यांनी अभिनंदन केले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed