• Thu. Nov 14th, 2024

    ‘साहिबजादे’यांच्या धैर्य आणि हौतात्म्याला महाराष्ट्राचा सलाम… – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Dec 29, 2022
    ‘साहिबजादे’यांच्या धैर्य आणि हौतात्म्याला महाराष्ट्राचा सलाम… – महासंवाद

    महाराष्ट्र आणि पंजाबचे सामाजिक सुधारणा, साहित्यिक, अध्यात्मिक ऋणानुबंध अनेक शतकांपासून आहेत. संत नामदेव, गुरु गोविंद सिंग, हुतात्मा राजगुरु यांच्यामुळे हे सर्वज्ञात आहेच.. “वीर बाल दिवस” कार्यक्रामच्या च्या निमित्ताने नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिले होते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि पंजाबचे हे ऋणानुबंध अधिक दृढ होत आहेत…

    महाराष्ट्र आणि पंजाब यांचे शतकांपासूनचे आत्मतीयेचे, आंतरिक नाते आहे. संत नामदेव भारत भ्रमण करीत असताना पंजाबच्या घुमानमध्ये पोहोचले आणि तिथलेच झाले. त्यांच्या वाणीत, कर्तृत्वात ऐवढे बळ होते ज्यामुळे त्यांच्या अभंगांचा अंर्तभाव ‘गुरू ग्रंथ साहेब’या ग्रंथामध्ये आहे. दशमेश (दहावे) गुरू गुरू गोविंदसिंग यांनाही महाराष्ट्रात यावेसे वाटले. नांदेडमध्ये त्यांच्या नावे ‘सचखंड श्री हजूर साहेब’असे शीख अनुयायांचे महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे.

    महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये असणारे साधर्म्य हे अनेक विषयात दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्र आणि पंजाब यांनी कित्येक क्रांतिकारांना जन्म दिला. देशाचे नेतृत्व केले. भगतसिंगासोबत हसत हसत फाशीवर चढणारे राजगुरू हे ही महाराष्ट्राचेच.  महाराष्ट्र आणि पंजाब चे ऋणानुबंध किती विशेष आहेत. दोन्ही राज्यातील बहुसंख्य जनता ही कृषीनिगडीत व्यवस्थेवर आधारित आहे. पंजाब रेंजीमेंट आणि मराठा रेजीमेंटच्या शौर्यगाथा आपण ऐकतच मोठे झालो आहोत. देशाच्या मातीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे महाराष्ट्र आणि पंजाब हे शौर्य आणि धाडस, आणि अध्यात्माची पंरपरा जोपासणारी राज्ये आहेत.

    महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये  साहसाचे बाळकडू घरातूनच मिळते.  माता गुजरी आणि गुरू तेगबहादूर यांच्याकडून अदम्य साहसाचे संस्कार गुरू गोविंदसिंग यांना मिळाले आणि पुढे हाच वारसा त्यांच्या ‘साहिबजादे’ बाबा अजीत सिंग, बाबा जुझार सिंग तसेच ‘छोटया साहिबजादे ’ साहिबजादे बाबा जोराव‍रसिंग आणि बाबा फतेहसिंग यांना मिळाला. अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद त्यासाठी शेवटपर्यंत निसंकोचपणे शौर्याने उभे राहणे या साहिबजाद्यांचे आचरण ‘मूर्ती लहान आणि किर्ती महान’अशीच आहे. त्यांना २६ डिसेंबरला हौतात्म आले.

    हा दिवस ‘वीर बाल दिवस’म्हणून पाळण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांचा गुरू गोविंदसिंगशी असलेले नातं बघता या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नवी दिल्ली येथे आयोजित उपक्रमास मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये येथे आंमत्रित करण्यात आले होते. या ऐतिहासिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले संबोधन उपस्थितांच्या  ह्दयाला भिडल्याच्या भावना उपस्थितांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या कार्यक्रमातील उपस्थिती आणि संबोधनामुळे पंजाब आणि महाराष्ट्राच्या दृढ संबंधाचे नवे पर्व निर्माण होईल.

    अवघे ९ वर्ष आणि ६ वर्ष वय असणारे छोटे साहिबजादे बाबा जोराव‍रसिंग आणि बाबा फतेहसिंग यांनी अदम्य शौर्याचा परिचय देत स्वाभीमानीपणे प्राणार्पण करत त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्यामध्ये गुरू गोविंदसिंग यांचे रक्त असल्यामुळे या साहबजादे यांनी अदम्य धाडस दाखविले. त्यांच्या या अदम्य धाडसाला महाराष्ट्राच्या जनतेचा सलाम. त्यांना विनम्र अभिवादन…

    000

    अंजु निमसरकर, माहिती अधिकारी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed