• Sat. Sep 21st, 2024

माया केअर तर्फे ज्येष्ठ नागरिकांना मोफत मदतीचे सुविधा

ByMH LIVE NEWS

Dec 16, 2022


औरंगाबाद-प्रतिनिधी

गेल्या 13 वर्षापासून माया केअर तर्फे सर्व गरजू वृद्ध व्यक्तींना त्यांच्या भावनिक- बौद्धिक ने-आण करणे अशा गरजांची पूर्तता करण्यासाठी विनामूल्य सुविधा देते ज्यामुळे ते आनंदी आणि आत्मनिर्भर जीवन जगू शकतात.
ज्येष्ठांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे, बँकेच्या कामात मदतीचे हातभार देणे , शासकीय कामात मदत करणे , औषधी दुकानातून औषधे आणून देणे , त्यांच्यासोबत बागेत फेरफटका मारणे , व्हिडिओ कॉल करण्यासाठी मदत करणे , त्यांच्यासाठी लिहिणे – वाचणे , मनोरंजनात्मक खेळ खेळणे, तसेच त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे यासह अनेक प्रकारची मदत स्वयंसेवकांच्या साहाय्याने पूर्णपणे मोफत केली जाते.
सध्या ही संस्था भारताच्या 50 शहरांमध्ये व UK तील 5 शहरांमध्ये काम करते. या संस्थेचे मागील कामकाज 100 पेक्षा जास्त अपंग (बिंदू समूह) व्यक्ती आपल्या घरी बसून करत आहेत. यामुळे त्यांना रोजगारही उपलब्ध होत आहे व तेही आत्मनिर्भर बनत आहेत.या संस्थेच्या मार्फत आत्तापर्यंत ज्येष्ठांना 11000 पेक्षा जास्त वेळा भेटी दिल्या आहेत.
वृद्धांना त्यांच्या स्वतःच्या घरात व वृद्धाश्रमात ,सहाय्यक आयुष्यात स्वतंत्र , आनंदी आणि सोयीस्कर जीवन जगण्यासाठी सक्षम बनवणे आणि अपंग व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी त्यांच्याकडून स्वतःच्या घरातून काम करून घेऊन स्वावलंबी व्यवसायिक बनवण्याचे उद्दिष्ट आहे .तसेच जगातील प्रत्येक शहरातील ज्येष्ठांना ही सुविधा मोफत मिळावी व तेथील अपंग व्यक्तींना रोजगार उपलब्ध व्हावा या दिशेने संस्थेचे कामकाज सुरू आहे.
आपणासही अशा प्रकारची मदत हवी असल्यास 9552510400 /9552510411 या हेल्पलाइनवर संपर्क साधा अथवा www.mayacare.org या संकेत स्थळाला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed