• Tue. Nov 26th, 2024

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन

    ByMH LIVE NEWS

    Nov 25, 2022
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन

    कोल्हापूर दि २५ ( जिमाका) हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या ३० केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन तसेच १ लाख ६२ हजाराव्या साखर निर्मिती पोत्याचे पूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले .

    यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार प्रा . संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने , राज्य नियोजन मंडळाचे कार्य. अध्यक्ष राजेश क्षीरसागर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आदी उपस्थित होते.

    शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी 22 ऑक्टोबर 2002 साली सुरु झालेल्या या कारखान्याने साखर आणि उपपदार्थ निर्मितीला प्राधान्य देत डिस्टिलरीच्या रूपाने आणखी एक नवीन टप्पा गाठल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. सुमारे 73 कोटी रुपये खर्च करून हा ३० केएलपीडी (झीरो डिस्जार्ज) चा डिस्टिलरी  प्रकल्प कारखान्याने उभा केला आहे .या कारखान्यात उत्पादित झालेली साखर इंडोनिशिया, सौदी अरेबिया आदी देशात निर्यात केली जाते .

    याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष थ . बा . कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी भूपाल आवटी, संचालक सर्वश्री प्रकाश पाटील, रावसाहेब बिलवडे, सुभाषसिंग राजपूत , आप्पासाहेब चौगुले, डी .बी पिष्टे, आदित्य व अजय पाटील यड्रावकर यांच्यासह नरंदे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed